कार्तिकी एकादशीपूर्वीच पंढरपूरात 3 लाख भाविक
पंढरपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूरात होत आहे. यासाठी सध्या पंढरपूर येथे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी भाविकांच्या गर्दीने फ़ुलून गेली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत.3 lakh devotees in Pandharpur even before Kartiki Ekadashi
कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागेच्या काठावर भाविकांची लगबग सुरु आहे. तर मंदिरात 5 टन झेंडूच्या फुलांची सजावट राम जांभूळकर या भक्तांने केली आहे. कार्तिकीसाठी 3 विशेष रेल्वे गाड्याच्या 17 फेर्या तर 1500 जादा एसटी बसेस मधून भाविक सध्या पंढरपूरात येत आहे.
सध्या विठ्ठल दर्शनाच्या रांगेमध्ये सुमारे 30 हजाराहून अधिकचे भाविक उभे आहेत. दर्शन रांगेसाठी दहा पत्रा शेडसह सुमारे पाच किलोमीटरची दर्शन रांग मंदिर समितीकडून उभा करण्यात आली आहे यामध्ये भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, फराळ अशा सुविधा पुरवण्यात येत आहेत. तर 1300 कर्मचारी पंढरपूरच्यी स्वच्छता करत आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 8 तासांचा कालावधी लागत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपुरात एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी येतील शुक्रवारी पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरामध्ये मानाच्या वारकऱ्यासमवेत शासकीय महापूजा होईल.
ML/KA/PGB
3 Nov .2022