जुलैमध्ये जीएसटी संकलनात 33 टक्क्यांची वाढ

 जुलैमध्ये जीएसटी संकलनात 33 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन (GST collection) जुलै महिन्यात 33 टक्क्यांनी वाढून 1.16 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. जुलैमधील जीएसटी महसू्लाची आकडेवारी अर्थव्यवस्थेत (economy) वेगाने सुधारणा होत असल्याचे दर्शवत आहे. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. जून 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजे 92,849 कोटी रुपये होते.
आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल (GST Revenue) 1,16,393 कोटी रुपये होता. यामध्ये केंद्रीय जीएसटी 22,197 कोटी रुपये, राज्य जीएसटी 28,541 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 57,864 कोटी रुपये (त्यापैकी 27,900 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीवर जमा झाले) आणि उपकर 7,790 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर 815 कोटी रुपये जमा झाले.) होते.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 36% जास्त
36% more than the same month last year

जुलै 2021 मध्ये जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा एक वर्षापूर्वीच्या याच महिन्यापेक्षा 33 टक्के अधिक आहे. यामध्ये 1 ते 31 जुलै पर्यंत भरलेल्या जीएसटी व्यतिरिक्त त्याच कालावधीसाठीच्या आयजीएसटी आणि मालाच्या आयातीवर (Import) जमा केलेला उपकर यांचा समावेश आहे. आढावा घेण्यात आलेल्या महिन्यात मागील वर्षी याच महिन्याच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीतून महसूल 36 टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे, देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) संकलन 32 टक्के जास्त आहे.

निर्बंध शिथिल केल्यामुळे जीएसटी संकलन पुन्हा वाढले
GST collection increased again due to relaxation of restrictions

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, सलग आठ महिने जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. त्यानंतर जून 2021 मध्ये तो कमी झाला होता. याचे कारण असे की जूनच्या संकलनाचा मे महिन्यातील व्यवहाराशी संबंध होता. मे 2021 मध्ये कोविड -19 मुळे बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण किंवा आंशिक टाळेबंदी (Lockdown) लावण्यात आली होती. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड -19 शी (covid-19) संबंधित निर्बंध शिथिल केल्यामुळे जुलैमधील जीएसटी संकलनाचा आकडा पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत (economy) वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.
Goods and Services Tax (GST) collection increased by 33 per cent to Rs 1.16 lakh crore in July. This information has been given by the Ministry of Finance. The GST revenue figures for July show that the economy is improving rapidly. In July 2020, GST collection was Rs 87,422 crore. In June 2021, GST collection was less than Rs 1 lakh crore, or Rs 92,849 crore.
PL/KA/PL/2 AUG 2021
 

mmc

Related post