आठवडयाच्या शेवटी भांडवली बाजाराची(Stock Market) शानदार वापसी.

 आठवडयाच्या शेवटी भांडवली बाजाराची(Stock Market) शानदार वापसी.

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत):  13 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशांतर्गत आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू राहिल्याने भारतीय बाजारांना मागील आठवड्यातील काही नुकसान भरून काढण्यात यश मिळाले. बाजाराची आठवड्याची सुरुवात मजबूत झाली परंतु पुढील तीन सत्रे बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला. IT क्षेत्रातील प्रमुखांकडून (TCS/Infosys) सकारात्मक निमाही निकाल आणि यूएस आणि भारतातील मजबूत मॅक्रो इकॉनॉमिक डेटामुळे आठवड्याचे अंतिम सत्र सकारात्मक नोटवर बंद होण्यास मदत झाली. तसेच अर्थसंकल्पापूर्वी देशातील अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर काही दिलासादायक बातम्या आल्या.
गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये देशातील किरकोळ महागाई दर (CPI) 5.72 टक्क्यांवर आला आहे, जो गेल्या एका वर्षातील सर्वात कमी होता. तर नोव्हेंबरमध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात (IIP) 7.1 टक्क्यांनी वाढ झाल्याची बातमीही आली.
गेल्या आठवड्यात रुपयात देखील मजबूत झाला. भारतीय रुपया 13 जानेवारी रोजी 138 पैशांनी वाढून 81.34 प्रति डॉलरवर बंद झाला.
शुक्रवारी जागतिक बाजारातून सुद्धा तेजीचे संकेत मिळाले. यूएस मार्केट शुक्रवारी वाढीसह बंद झाला, DowJones 112 अंक आणि Nasdaq 0.71% वर गेला. युरोपीय बाजारही हिरव्या चिन्हाने बंद झाले.

गुंतवणूकदारांचे लक्ष येणाऱ्या आठवड्यात १६ जानेवारी जाहीर होणाऱ्या भारताच्या WPI आकडे तसेच अमेरिकेचे १८ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या IIP DATA कडे असेल. या आठवड्यात INDUSIND BANK,ASIAN PAINTS,HUL,HDFC LIFE,JSW STEEL या दिग्गज कंपन्यांचे निकाल जाहीर होतील.
Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने 17795 चा स्तर तोडला व 17761 चा स्तर गाठला. शुक्रवारी निफ्टीने 17956 चा बंद दिला. वर जाण्याकरिता निफ्टीने हे 18040-18100-18121-18149 हे स्तर पार करणे आवश्यक आहे.हे स्तर निफ्टीने पार केले तर निफ्टी 18230-18243-18265-18318 हे स्तर गाठू शकते तसेच निफ्टीला 17774-17761-17723 हे स्तर राखणे जरुरी आहे अन्यथा निफ्टीत मोठी घसरण होऊ शकते.

पहिल्याच दिवशी बाजारात जोरदार तेजी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत मजबूत तेजी झाली.शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेतील उत्तम जॉब डेटामुळे अमेरिकन व युरोपियन बाजार चांगलेच वधारले व त्याच्या परिणाम आशियाई बाजारावर दिसला. यूएस फेडने व्याजदर वाढवण्याची आक्रमकता कमी करेल या आशेने आणि चिनी अर्थव्यवस्था पुन्हा उघडण्याच्या आशेने बाजारात जोश भरला.गुंतवणूकदारांनी चौफर खरेदी केली.सेन्सेक्स ९०० अंकाहून अधिक वधारला.बाजारातील प्रत्येक सेक्टरमध्ये खरेदी झाली. सर्वाधिक तेजी आयटी क्षेत्रात झाली. आयटी निर्देशांक सुमारे 3 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मेटल इंडेक्स 1.5 टक्के आणि ऑटो इंडेक्स 1 टक्क्यांनी वधारला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 846 अंकांनी वधारून 60,747 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 241 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,101 चा बंद दिला.

सेन्सेक्स ६३१ अंकांनी घसरला. Sensex tanks 631 points

मागील सत्रात स्मार्ट रिकव्हरी झाली असताना देखील, मंगळवारी बाजाराची सुरुवात नकारात्मकतेने झाली आणि दिवस जसजसा वाढत गेला तसतसा विक्री वाढली, निफ्टी दिवसभरात 17,900 च्या खाली घसरला. परंतु शेवटच्या तासाच्या खरेदीमुळे काही नुकसान कमी होण्यास मदत झाली. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी अमेरिकन बाजारांवर दबाव दिसून आला होता व त्याचाच परिणाम दुसऱ्या दिवशी आशियाई बाजारावर दिसला. सेन्सेक्सने ७०० अंकांची गटांगळी खाल्ली. बँक, आयटी, मेटल आणि फायनान्स कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीमुळे बाजार घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 631अंकांनी घसरून 60,115 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 187अंकांची घट होऊन निफ्टीने 17,914 चा बंद दिला.

बाजाराचा सपाट बंद.Market ends flat

बुधवारी सकारात्मक जागतिक संकेत असूनही, बाजार नकारात्मक उघडला व दिवसभर बाजार वर खाली असा झुलत राहिला अत्यंत अस्थिर असे सत्र राहिले. देशांतर्गत आणि यूएस इन्फ्लेशन डेटा जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर गुंतवणूकदारानी सावध पवित्र घेतला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 9.98 अंकांनी घसरून 60,105 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 18 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,895 चा बंद दिला.

बाजाराची घसरण सुरूच.

बाजाराची सुरुवात अत्यंत शांततेत झाली आणी दिवस जसजसा वाढत गेला तसतशी विक्री वाढली. परंतु खालच्या पातळीवर खरेदी झाल्याने काही इंट्राडे नुकसान भरून काढण्यास मदत झाली. टीसीएसच्या सावध इशाऱ्यानंतर गुंतवणूकदार इतर आयटी कंपन्यांच्या कमाईची आतुरतेने वाट पाहत असल्याने देशांतर्गत बाजारपेठ अस्थिर होता. तसेच महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला कारण याचा केंद्रीय बँकांच्या व्याजदर वाढीच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो याची भीती गुंतवणूकदारांच्या मनात होती. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 147अंकांनी घसरून 59,958 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 37 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,858 चा बंद दिला.

तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक.

गेल्या तीन दिवसांच्या घसरणीला शुक्रवारी ब्रेक लागला. सकारात्मक जागतिक संकेत असूनही बाजाराची सुरुवात घसरणीने झाली.सत्राच्या मध्यभागी झालेल्या खरेदीने मात्र सर्व तोटा पुसून टाकला आणि सत्र दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ संपले.सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ झाली. महागाईच्या आकडेवारीत झालेली घट व इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील खरेदीमुळे बाजाराला चालना मिळाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 303 अंकांनी वधारून 60,261 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 98 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,956 चा बंद दिला.
(लेखकशेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
14 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *