सरकारला मिळणारा कर महसूल अंदाजापेक्षा…
नवी दिल्ली, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या आर्थिक वर्षात सरकारला मिळणारा कर महसूल (tax revenue) अर्थसंकल्पात (budget) दिलेल्या अंदाजापेक्षा 10 टक्के जास्त असू शकतो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत प्रथमच कर महसूल अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा जास्त असणार आहे. कोविडच्या आधीच्या पातळीच्या वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था सरकारचा उत्साह वाढवत आहे.
सरकारने 31 मार्चला संपणार्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात (budget) कराद्वारे 15.45 लाख कोटी रुपयांचा महसुल (tax revenue) मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कर संकलन 2017-18 या आर्थिक वर्षापासून सातत्याने अंदाजापेक्षा कमी राहिले आहे. वास्तविक, कोविड येण्यापूर्वीच अर्थव्यवस्था (economy) मंदावली होती आणि नंतर मंदीच्या भोवऱ्यात अडकली होती.
पण, आता किरकोळ क्षेत्राच्या विक्रीत तेजीचा कल आहे आणि निर्यातीत विक्रमी वाढ होत आहे. यावरुन कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था (economy) अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने सावरत आहे हे लक्षात येते. या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान जीडीपी 20.1 टक्क्यांच्या दराने वाढला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 24.4 टक्क्यांनी कमी झाला होता.
एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की आर्थिक घडामोडींमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. सर्व निर्देशक अपेक्षेपेक्षा जलद सुधारणेकडे निर्देश करत आहेत. सर्व काही सुरळीत राहिले तर या आर्थिक वर्षातील कर महसुल (tax revenue) संकलन अंदाजापेक्षा जास्त होईल.
कर संकलन मजबूत राहिले आणि सरकारने खासगीकरणातून 2021-22 च्या महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले तर वित्तीय तूट 30 ते 40 बेसिस पॉइंट्सने म्हणजेच 0.30 ते 0.40 टक्क्यांनी कमी होईल. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 6.8 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपला हिस्सा विकून या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एअर इंडिया टाटा समूहाला विकल्याने सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सरकारी सूत्रानुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सूचीबद्ध करुन सरकारला एक लाख कोटी रुपये मिळू शकतात. त्यांच्या मते, भारतीय जीवन विमा महामंडळ सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया ते करत आहेत. मार्चपर्यंत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मानांकन कंपनी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने याच महिन्यात भारताबद्दलचा आपला दृष्टीकोन नकारात्मक वरून स्थिर केला आहे. त्यांनी सांगितले आहे की देशाची अर्थव्यवस्था (economy) आणि वित्तीय संस्थांमध्ये कमजोरी वाढण्याची शक्यता कमी झाली आहे.
The tax revenue received by the government in this financial year may be 10 per cent higher than the estimate given in the budget. According to official sources, for the first time in the last four years, the tax revenue will be higher than the budget estimate. The economy, which is moving at a faster pace than Kovid’s previous level, is boosting the government’s enthusiasm.
PL/KA/PL/27 OCT 2021