सरकारच्या पॅकेज घोषणेचा वित्तीय तूटीवर वाईट परिणाम होणार
नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साथीचा परिणाम झालेल्या क्षेत्रांना कर्ज (Loan) देण्याचा अलिकडचा निर्णय तसेच अन्य उपाययोजनांमुळे वित्तीय तूटीवर (Fiscal Deficit) 0.60 टक्क्यांचा अतिरिक्त परिणाम होईल. यामुळे बँकांना 70 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरलता सुविधा उपलब्ध होईल. एका अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पॅकेजची एकत्रित रक्कम 6.29 लाख कोटी रुपये होते
The total amount of the package is Rs 6.29 lakh crore
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी सोमवारी लघुउद्योग क्षेत्रांना दीड लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज (Loan) उपलब्ध करण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी आरोग्य क्षेत्राला अतिरिक्त निधी, पर्यटन संस्था आणि मार्गदर्शकांना कर्ज तसेच व्हिसा शुल्क माफी यासारख्या घोषणा केल्या. हे पॅकेज प्रामुख्याने बँका आणि सुक्ष्म वित्तसंस्थांना सरकारी हमीच्या स्वरूपात दिले जाते. आधीच्या अशा प्रकारची पॅकेज एकत्र करुन ही रक्कम 6.29 लाख कोटी रुपये होते.
70,000 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होऊ शकेल
A loan of Rs 70,000 crore may be available
एसबीआय रिसर्चने (SBI Research) केलेल्या विश्लेषणानुसार 1.10 लाख कोटी रुपयांच्या नव्या घोषणांच्या समान वितरणाचे अंदाज, सोबत 50 टक्के आणि 75 टक्के हमी आणि 100 टक्के जोखीमेसह बँकांकडे सुमारे 7,500 कोटी रुपयांचे भांडवल असेल. त्यामुळे 70,000 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) उपलब्ध होऊ शकेल. एसबीआयच्या मुख्य अर्थतज्ञ सौम्या कांती घोष यांनी अहवालात म्हटले आहे की, सोमवारच्या घोषणांमध्ये आरोग्य, पर्यटन, एमएफआय आणि शेती या चार क्षेत्रांवर विस्तृतपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या इतर उपायांमुळे विद्यमान यंत्रणेत सुधारणा होईल.
The recent decision to provide loans to the affected areas as well as other measures will have an additional 0.60 per cent impact on the fiscal deficit. This will provide an additional liquidity facility of Rs 70,000 crore to the banks. This is according to a report.
PL/KA/PL/30 JUNE 2021