जगभरातील सरकारी रोख्यांचे मानांकन घटले तर समभागांकडून चांगल्या परताव्याची अपेक्षा
लंडन, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील सर्वात मोठे मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅकरॉक (Blackrock) यांनी जगभरातील बाजारपेठेतील सरकारी रोख्यांचे मानांकन (Rating of Government Bonds) कमी केले आहे, परंतु समभागांवरील (Shares) विश्वास कायम ठेवला आहे. याचा अर्थ असा आहे की थोड्याफार सुरक्षिततेसह व्याज उत्पन्न देणार्या गुंतवणूक पर्यायांवरचा त्यांचा विश्वास कमी झाला आहे. ब्लॅकरॉककडून सरकारी रोख्यांचे मानांकन कमी होण्याचे कारण वेगाने होणारे कोव्हिड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) आणि अमेरिकेत 2.8 लाख कोटी डॉलरपर्यंतचा जास्तीचा खर्च होण्याची शक्यता हे आहे.
अमेरिकन रोख्यांचा परतावा सरासरीपेक्षा कमी असण्याचा अंदाज
ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट संस्थेच्या रणनीतिकारांनी त्यांच्या साप्ताहिक टिप्पणीमध्ये लिहिले आहे की त्यांची संस्था अमेरिकन ट्रेझरीला (रोखे) दिले जाणारे ‘अंडरवेट’ मानांकन वाढवत आहे. अंडरवेट मानांकनाचा अर्थ असा आहे की ब्लॅकरॉकच्या (Blackrock) मते, रोख्यांच्या परताव्याची श्रेणीच्या सरासरीपेक्षा कमी असू शकते. अमेरिकन ट्रेझरीचे उत्पन्न म्हणजेच व्याजाच्या रुपाने होणारा वार्षिक निव्वळ नफा, फेब्रुवारी 2020 पासून उच्च पातळीवर पोहोचला, कारण त्या आठवड्यात मोठ्या संख्येने रोखे विकले गेले. रोखे जारी करणार्या संस्था किती व्याज दर देते यावर उत्पन्न अवलंबून असते. उत्पन्न आणि रोख्यांच्या किंमतींचा उलटा संबंध असतो, म्हणजेच एक वाढला तर दुसरा कमी होतो.
युरोपच्या शेअर बाजाराच्या मानांकनाची श्रेणी सुधारित केली
जागतिक मालमत्ता व्यवस्थापकाने असेही म्हटले आहे की त्याने युरोपियन शेअर बाजाराचे आपले मानांकन सुधारुन न्युट्रल केले आहे. त्यांच्या मते बाकीच्या देशांपेक्षा त्याठिकाणी जास्त तेजी येईल. परंतु त्यांनी त्याठिकाणचे पतमानांकन (credit Rating) आणि युरो क्षेत्र परिघातील सरकारी रोख्यांची श्रेणी कमी करुन न्युट्रल केले आहे.
ब्रेग्झिटमुळे ब्रिटनच्या समभागांना ‘ओव्हरवेट’ मानांकन
ब्रेग्झिटमुळे ब्रिटनच्या समभागांना ‘ओव्हरवेट’ मानांकन दिल्याचेही ब्लॅकरॉक (Blackrock) यांनी नमूद केले आहे. त्यांनी अमेरिकेच्या आणि विकसनशील देशांच्या शेअर बाजारांचे ओव्हरवेट’ मानांकन कायम ठेवले आहे परंतु जपानच्या शेअर बाजाराचे ‘अंडरवेट’ आहे.
2016 च्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत ब्रिटनच्या एफटीएसई 100 आणि एफटीएसई 250 ची कामगिरी जागतिक शेअर बाजार निर्देशांकापेक्षा कमकुवत आहे. त्याच वर्षी झालेल्या जनमत संकलनात ब्रिटनच्या लोकांनी युरोपिय संघापासून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला होता.
PL/KA/PL/24 FEB 2021