नव्या EV धोरणाला सरकारची मंजुरी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर सध्या इलेक्ट्रीक वाहनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विविध Automobile कंपन्या आकर्षक आणि अत्याधुनिक EV बाजारात उपलब्ध करून देत आहेत. हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी करणाऱ्या या वाहनांमुळे सरकारही या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. तरुणाईमध्येही या वाहनांची क्रेझ दिसून येत आहे.या वाहनांच्या उपयोजनाचे सर्वांगिण फायदे लक्षात घेऊन भारताला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या नवीन EV धोरणाला मंजुरी दिली आहे.
या नवीन धोरणात कंपन्यांना किमान ₹4150 कोटींची गुंतवणूक करावी लागणार असून जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.धोरणानुसार, कंपन्यांना भारतात ईव्हीचे उत्पादन आणि व्यावसायिक उत्पादन तीन वर्षांत सुरू करावे लागेल. यासंदर्भातील अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (MoCI) आज (15 मार्च) जारी केली आहे.नवीन धोरणामुळे अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची ईव्ही कंपनी टेस्लासाठी भारतात प्रवेश करणे सोपे झाले आहे, जी बऱ्याच काळापासून भारतात प्रवेश करण्याचा मार्ग शोधत आहे.
SL/ML/SL
15 March 2024