रेशन दुकानात वापरली जाणार ‘आय स्कॅनर गन’

 रेशन दुकानात वापरली जाणार ‘आय स्कॅनर गन’

जळगाव, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक उपकरणांच्या वापरामुळे तळागाळातील व्यक्तींचे आयुष्य सुरळीत व्हावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाता. खेडोपाडी तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी सज्ज असलेल्या राज्य सरकारडून आता स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ वापरण्यात येणार आहेत. रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉज मशिनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातांनी लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात आता ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. त्यामुळे व्यक्तीचे डोळे स्कॅन करून खात्री केली जाईल व त्या व्यक्तीला धान्य दिले जाणार आहे. जळगाव शहरातील काही दुकानांत प्रायोगिक तत्त्वावर उपयोग केला जात असून, लवकरच राज्यातील सर्वच दुकानांत आय स्कॅनर गन दिली जाणार आहे.

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉज यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव धानर दुकानात ई-पॉज यंत्र आहे. मात्र, काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः गवंडी काम करणाऱ्या व्यक्ती, धुणीभांडी करणाऱ्या महिला यांना ही समस्या जाणवते. संबंधित व्यक्तीला धान्य दुकानदार ओळखत असूनही ई-पॉज यंत्रावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना धान्य देता येत नाहीत.

यामुळे कोणत्याही व्यक्तीला धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागणार नाही. आधार कार्ड काढताना डोळ्यांचे स्कॅनिंग करून ‘आयरीज’ घेतले आहेत. त्यामुळे आय स्कॅन केल्यानंतर आधार नंबरशी त्याची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा ओळख पटते. त्यामुळे आधार कार्डसाठीचा ‘डाटा’ येथे उपयोगात येणार आहे

SL/ML/SL

15 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *