नागरिकांच्या हक्कांसाठी नगरसेवक अमेय घोले यांनी केले रास्ता रोको आंदोलन!
मुंबई, दी २९
दादर पूर्व परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांकडून होणारी वाढीव जबरदस्ती भाडेवसुलीच्या विरोधात नगरसेवक अमेय घोले यांनी दादर पूर्व परिसरात रस्त्यावर बसून रस्ता रोको आंदोलन केले.
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा, लेखी तक्रारी आणि वारंवार स्मरणपत्रे देऊनही माटुंगा पोलीस व वाहतूक पोलीस विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने येथील प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
खासगी पर्यटक बसेसचे अनधिकृत थांबे, वाहतूक कोंडी, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील शेअर टॅक्सींची बेशिस्त, अनधिकृत पार्किंग आणि प्रवाशांकडून होणारी अवाजवी भाडेवसुली यावरही तातडीने कारवाई करावी.
आठवडाभरात या समस्यांचे निराकरण न झाल्यास पुढील आठवड्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातही तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
नागरिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील अशी माहिती नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.KK/ML/MS