पुढील आर्थिक वर्षात जीडीपीची वाढ 13.7 टक्के असेल ; मूडीजचा अंदाज

 पुढील आर्थिक वर्षात जीडीपीची वाढ 13.7 टक्के असेल ; मूडीजचा अंदाज

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीजने (Rating agency Moody’s) गुरुवारी पुढील आर्थिक वर्षातील भारताच्या विकास दराच्या अंदाजात बदल केला आहे. पुढील आर्थिक वर्षात भारताची जीडीपी (GDP) वाढ 13.7 टक्के राहील, असे संस्थेने म्हटले आहे. यापूर्वी संस्थेने याच काळात ती 10.8 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. व्यवसायिक घडामोडी सामान्य झाल्याने आणि कोविड-19 (Covid-19) लस आल्यानंतर बाजारपेठेत आत्मविश्वास वाढल्यामुळे संस्थेने पूर्वीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. अमेरिकन पतमानांकन संस्थेचा अंदाज आहे की चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 7 टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून येईल. आधीच्या 10.6 टक्के घसरण होण्याच्या अंदाजापेक्षा ही चांगली आकडेवारी आहे.
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर (सॉवरेन रिस्क) जीनी फांग यांनी सांगितले की सध्या आमचा अंदाज आहे की मार्च 2021 रोजी संपत असलेल्या आथिर्क वर्षासाठीच्या (Financial Year)अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांची घसरण होऊ शकते … घडामोडी सामान्य होणे आणि बेस इफेक्ट यामुळे पुढील आर्थिक वर्षात 13.7 टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज आम्ही व्यक्त करत आहोत.
फांग यांनी सांगितले की, वाढीच्या दरामध्ये पुन्हा तेजी येण्यावरुन दिसून येते की लसीकरण मोहिम (Vaccination) आणि बाजारातील आत्मविश्वास वाढल्याने विविध व्यवसायिक घडामोडींमध्ये प्रगती सुरू राहील. मूडीज आणि तिचे भारतातील भागीदार आयसीआरए यांनी आयोजित केलेल्या ‘इंडिया क्रेडिट आऊटलुक 2021’ या ऑनलाइन परिषदेला संबोधित करतांना फांग ​​यांनी हे सांगितले. आयसीआरए च्या मुख्य अर्थतज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की चालु आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत संस्थेचा 0.3 टक्यांच्या आर्थिक वाढीचा अंदाज आहे.
PL/KA/PL/26 FEB 2021

mmc

Related post