मुंबई गोवा महामार्ग रखडल्याबद्दल गडकरींची दिलगिरी

 मुंबई गोवा महामार्ग रखडल्याबद्दल गडकरींची दिलगिरी

पनवेल, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : असंख्य अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या वर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज रायगड जिल्ह्यातील खारपाडा इथे दिली आणि हा महामार्ग रखडल्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली.

या महामार्गाच्या पळस्पे ते कासु दरम्यानच्या काँक्रीटीकरण शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते, राज्यातील मंत्री उदय सामंत, रवींद्र चव्हाण , खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्यासह स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जे एन पी टी ते दिल्ली या नव्या थेट रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल , त्यामुळे या बंदरातून होणारी कंटेनर आणि मोठ्या गाड्यांची वाहतूक केवळ वीस , बावीस तासात थेट दिल्ली पर्यंत होईल , सध्या यासाठी ५५-६० तास लागतात असं गडकरी म्हणाले.

कोकणातील पर्यटन वाढीसाठी पन्नास हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत ,कळंबोली नाका सुधार प्रकल्पाचं भूमिपूजन पुढील महिन्यात करण्यात येईल असं ही ते म्हणाले.

कोकणातील पर्यटन वाढीसाठी सी प्लेन , जल वाहतूक ज्यात वॉटर टॅक्सी आणि हॉवर क्राफ्ट यांचा समावेश आहे अशी व्यवस्था लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *