RBI कडून सहा सहकारी बँकांवर कारवाई

 RBI कडून सहा सहकारी बँकांवर कारवाई

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॅंकांच्या आर्थिक व्यवहाकरांचे नियमन करणाऱ्या आणि आर्थिक शिस्त राखणाऱ्या रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन आणि नियामक चौकटीचे पालन न केल्याप्रकरणी सहा सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना १.१० लाख ते ३ लाख रुपयांदरम्यान दंड ठोठावण्यात आला आहे. यात पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवीतील श्री गणेश सहकारी बँक आणि सोलापुरातील व्यापारी सहकारी बँक मर्यादित या बँकांचा समावेश आहे.

कारवाई झालेल्या बॅंकामध्ये महाराष्ट्रातील श्री गणेश सहकारी बँक (नवी सांगवी, पिंपरी चिंचवड) आणि व्यापारी सहकारी बँक मर्यादित (सोलापूर) यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

तर उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्हा सहकारी बँक दोन लाख रुपये, दिल्लीतील दिल्ली नागरिक सहकारी बँक तीन लाख रुपये, पश्चिम बंगालमधील कोलकता पोलीस को-ऑपरेटिव्ह बँक १.१० लाख रुपये आणि गुजरातमधील मेहसाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २.१० लाख रुपये दंड करण्यात आला आहे.
ML/KA/SL
30 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *