नाल्यांमधून गाळ काढण्याचा वेग वाढवून विहित वेळेत कामे पूर्ण करावीत*डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

 नाल्यांमधून गाळ काढण्याचा वेग वाढवून विहित वेळेत कामे पूर्ण करावीत*डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

मुंबई, दि ५
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पश्चिम उपनगरांतील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक ५ मे २०२६) प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. गाळ काढण्याचा कामांचा वेग वाढवून विहित वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

पश्चिम उपनगरांतील कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरातील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांची तसेच जयवंत साळवी मार्गावरील मलजल प्रक्रिया केंद्राची (Sewage Treatment Plant) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी आज (दिनांक ५ मे २०२६) सकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर येथील पायल हॉटेल जंक्शन, रिव्हर व्यूव्ह ब्रिजजवळ दहिसर नदी, जयवंत साळवी मार्गावरील मलजल प्रक्रिया केंद्र, आर मध्य विभागातील म्हात्रे नाला, आर दक्षिण विभागातील पोईसर नदी, लालजी पाडा आदी ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामांची डॉ. शर्मा यांनी पाहणी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ उपसा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप वेळ असला तरी पूर्वतयारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून नाल्यांमधील कचरा, गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नाले स्वच्छतेची कामे पूर्ण होतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच काढण्यात आलेल्या गाळाची विहित वेळेत विल्हेवाट लावावी. गाळ पुन्हा रस्त्यावर, नदीत येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.

यावेळी सभागृह नेते श्री. गणेश खणकर, आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर, आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती लीना देहरकर, नगरसेविका श्रीमती योगिता पाटील, नगरसेविका श्रीमती अंकिता यादव, उप आयुक्त (परिमंडळ ७) श्री. मनीष वळंजू, सहायक आयुक्त श्री. रोहित त्रिवेदी, सहायक आयुक्त डॉ. प्रफुल्ल तांबे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *