परकीय चलनाचा साठ्यात आणखी झाली घट

 परकीय चलनाचा साठ्यात आणखी झाली घट

मुंबई, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Foreign exchange reserve) 4.531 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 28 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात तो कमी होऊन 629.755 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ही माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 21 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा (Foreign exchange reserve) 67.8 कोटी डॉलरने घसरून 634.287 अब्ज डॉलरवर आला आहे. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात तो विक्रमी 642.453 अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर होता.

रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 28 जानेवारी रोजी संपलेल्या अहवाल आठवड्यात परकीय चलन साठा (Foreign exchange reserve) कमी होण्याचे कारण एकूण गंगाजळीचा महत्त्वपूर्ण भाग मानल्या जाणार्‍या परकीय चलन मालमत्तेत (FCAs) झालेली घसरण आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता या आठवड्यात 3.504 अब्ज डॉलरने कमी होऊन 566.077 अब्ज झाली आहे. डॉलरमध्ये सांगण्यात येत असलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर-अमेरिकन चलनाच्या चढ उताराचाही समावेश होतो.

या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य 84.4 कोटी डॉलरने घसरून 39.493 अब्ज डॉलर झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह विशेष आहारण अधिकार संबंधित आठवड्यात 14.1 कोटी डॉलरने घसरून 19.011 अब्ज डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताचा चलन साठाही 4.2 कोटी डॉलरने घसरून 5.174 अब्ज डॉलर झाला आहे.

The country’s foreign exchange reserves fell by  4.531 billion. For the week ended January 28, it fell to  629.755 billion. This information has been received from the Reserve Bank of India.

PL/KA/PL/5 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *