अनुकूल संकेतांमुळे भांडवली बाजारात (Stock Market) वाढ.

 अनुकूल संकेतांमुळे भांडवली बाजारात (Stock Market) वाढ.

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

गेल्या आठवड्यात सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरला. सलग चार आठवड्यांच्या घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास अडीच टक्क्यांनी वाढले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयामुळे बाजाराने पुन्हा गती मिळविली. पाचपैकी चार राज्यांमधील विजयाने गुंतवणूकदारांना विश्वास दिला. तसेच रशिया आणि युक्रेनममध्ये चर्चेची नवीन फेरी झाली. कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली त्या मुळे जागतिक संकेतही सुधारले या सगळ्यामुळे बाजारातील सकारात्मकता वाढली. Market snaps four-week losing streak.

शुक्रवारी जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १.३ टक्के वाढ. IIP growth 1.32% in January 2022येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष रशिया व युक्रेनमधील घडामोडी (Russia-Ukraine Crisis), अमेरिकेत होणारी फेडरल रिझर्व्हची (Federal Reserve) बैठक याकडे असेल. रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेड काय निर्णय घेणार या कडे जगातील बाजारांचे लक्ष असेल.

बाजार शुक्रवार १८ मार्च रोजी होळीनिमित्त बंद राहतील.

तेलाच्या वाढत्या किमतीने बाजार होरपळला. Boiling oil prices spook markets
युक्रेन-रशिया युद्धामुळे वाढलेल्या तेलाच्या किमती, चलनवाढीची चिंता आणि जागतिक महागाई वाढीच्या चिंतेने सोमवारी ७ मार्च रोजी जागतिक बाजारपेठेत प्रचंड मोठी घसरण झाली. भारतीय बाजाराचे निर्देशांक सात महिन्यांहून अधिक नीचांकी पातळीवर गेले. अमेरिका आणि त्याचे सहयोगी रशियन तेल आणि नैसर्गिक वायूवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याने आणि आधीपासून असलेल्या निर्बंधांच्या वर अजून कडक निर्बंध लादणार असल्याच्या बातमीने कच्च्या तेलाच्या किमती १३वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या.
आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स सकाळी प्रति बॅरल $ १३९ पेक्षा जास्त (२००८ नंतरची सर्वोच्च पातळी) वर पोहोचले. तसेच रशियावरील देखील आर्थिक दबाव वाढत होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७७ च्या नीचांकी पातळीवर घसरला. या सगळ्यामुळे सेन्सेक्समध्ये १९००अंकांची घसरण झाली. निफ्टीने १५७११ च्या स्तर गाठला. बँकिंग, वित्तीय, ऑटो, FMCG आणि इंडेक्स हेवी वेट रिलायन्समध्ये मोठी घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १४९१ अंकांनी घसरून ५२,८४२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३८२अंकांनी घसरून १५,८६३ चा बंददिला. Markets slump to their lowest levels in eight months as the US and European Union mulled boycotting importing oil from Russia.

सलग चार दिवसांची घसरण थांबली, निफ्टी १६,०००च्या वर बंद.Market snaps 4-day losing streak, Nifty above 16,000
मंगळवारी भारतीय बाजारांमध्ये सलग ४ दिवसांची घसरण थांबली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. दिवसभर त्यात बरीच अस्थिरता होती.पण व्यवहाराच्या शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. बाजाराला फार्मा आणि आयटी समभागांची सर्वाधिक साथ मिळाली.तसेच राज्य निवडणुकीत भाजपच्या बाजूने एक्झिट पोल आल्याने, मिड आणि स्मॉलकॅप समभागातही खरेदी परतताना दिसली. पाश्चिमात्य देशातून सुद्धा सकारात्मक संकेत आल्याने सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५८१ अंकांच्या वाढीसह ५३,४२४ वर बंद झाला. त्याच वेळी,, निफ्टी१५० अंकांनी वधारून १६,०१३ चा बंददिला.

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात जोरदार खरेदी.
सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात जोरदार खरेदी झाली. धातू वगळता सर्व क्षेत्र हिरव्या रंगात बंद झाले. संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात मजबूत झाली.आणि जसजसा व्यापार दिवस वाढत गेला तसतसे युक्रेन नाटोचे सदस्यत्व घेणार नाही अशी बातमी समोर आली. ही बातमी आल्यानंतर तेजी पसरली. त्याचप्रमाणे एक्झिट पोलनंतर, १० मार्च रोजी घोषित होणार्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या बाजाराला हव्या तश्या अपेक्षेने बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली दिवसअखेर , सेन्सेक्स १२२३ अंकांच्या वाढीसह ५४६४७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३३१ अंकांच्या वाढीसह १६,३४५ चा बंद दिला.

अनुकूल संकेतांमुळे बाजारात वाढ. Market extends gains on favourable cues
गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. १० मार्च रोजी आलेले राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्यामुळे तसेच,कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्यामुळे जागतिक संकेतही सुधारले व त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज बाजारात गॅप-अप ओपनिंग दिसले आणि त्यानंतर भाजपच्या विजयाच्या शक्यतांसोबतच बाजाराची रॅलीही वाढत गेलीदरम्यान, रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री तुर्कस्तानमध्ये भेटणार असल्याची बातमी आली.याचाही परिणाम बाजारावर दिसलं . मात्र शेवटच्या तासात काही प्रमाणात नफावसुली झाली. सेन्सेक्स ८१७ अंकांच्या वाढीसह ५५,४६४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने २४९ अंकांच्या वाढीसह १६,५९४ चा बंद दिला.

बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. Market ends with little change
प्रचंड अस्थिरता असूनही बाजार शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी हिरव्या रंगात बंद होण्यात यशस्वी झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजार घसरणीसह उघडला.परंतु जसजसा कामकाजाचा दिवस पुढे सरकत गेला तसतशी बाजारात रिकव्हरी झाली पण दिवसभरात एका मर्यादेत व्यापार होताना दिसला. बाजाराच्या तेजीत फार्मा आणि ऑइल गॅस समभागांनी सर्वाधिक योगदान दिले. तर वाहन समभागांनी बाजारात दबाव निर्माण केला. दिवसअखेर सेन्सेक्स ८५ अंकांच्या वाढीसह ५५,५५० वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३५ अंकांच्या वाढीसह १६,६३० चा बंद दिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

12 Mar 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *