पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, ४६ रेल्वे रद्द

 पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, ४६ रेल्वे रद्द

पटियाला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. पंजबामधील पटियाला येथील शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या रेल रोको आंदोलनामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता रेल्वेने ४६ गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. तर १०० गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. फिरोजपूर विभागाचे डीआरएम सांज साहू यांनी सांगितले की, या संपामुळे रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत असून तिकीट रिफंड मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

डीआरएम सांज साहू यांच्या म्हणण्यानुसार, याआधी 29 एप्रिल रोजी रेल्वेने अंबाला-लुधियाना मार्गावर धावणाऱ्या 46 गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या होत्या. आता पुन्हा या 46 गाड्या 5 मेपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 100 लांब पल्ल्याच्या गाड्या लुधियानाहून चंदीगड मार्गे आणि धुरी-जाखल मार्गे चालवल्या जातील. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. बारमेर ते जम्मू तवी जाणारी ट्रेन क्रमांक 14661 जुनी दिल्ली-बाडमेर चक या मार्गावर धावेल. ट्रेन क्रमांक 15211 दरभंगा ते अमृतसर अंबाला कँटला जाणार

 • रद्द झालेल्या गाड्या
 • जुनी दिल्लीहून कटराला ट्रेन क्रमांक 14033, 14034
 • दिल्ली ते सराय रोहिला, मुंबई सेंट्रल ट्रेन क्रमांक 22401, 22402
 • नवी दिल्ली अमृतसर दरम्यान ट्रेन क्रमांक 12497,12498.
 • जुनी दिल्ली ते पठाणकोट ट्रेन क्रमांक 22429, 22430.
 • नवी दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 12459, 12460.
 • हरिद्वार-अमृतसर ट्रेन क्रमांक 12053, 12054.
 • नवी दिल्ली ते जालंधर सिटी ट्रेन क्रमांक 14681, 14682.
 • हिसार-अमृतसर ट्रेन क्रमांक 14653, 14654
 • चंदीगड आणि फिरोजपूर ट्रेन क्रमांक 14629, 14630.
 • चंडीगड-अमृतसर ट्रेन क्रमांक 12411, 12412.
 • नांगल ते अमृतसर ट्रेन क्रमांक 14506, 14505
 • चंदीगड ते अमृतसर ट्रेन क्रमांक 12241, 12242.
 • अंबाला ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04503,04504.
 • जाखल ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04509, 04510
 • लुधियाना ते भिवानी ट्रेन क्रमांक 04574
 • हिसार ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04575,04576.
 • अंबाला ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04579.
 • लुधियाना ते अंबाला ट्रेन क्रमांक 04582.
 • अंबाला ते जालंधर सिटी ट्रेन क्रमांक 04689, 04690.
 • हिसार ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04743, 04744.
 • लुधियाना ते चुरू ट्रेन क्रमांक 04746, 04745.
 • सिरसा ते लुधियाना ट्रेन क्रमांक 04573 (3 मे ते 5 मे पर्यंत रद्द)

SL/ML/SL

4 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *