#सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास 26 जानेवारी मोर्चा काढणार नाही : शेतकरी नेता टिकैत

 #सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास 26 जानेवारी मोर्चा काढणार नाही : शेतकरी नेता टिकैत

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात अजून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. हे तिन्ही कायदे परत घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची घोषणा केली आहे. यावर भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास शेतकरी प्रजासत्ताक दिनी हा मोर्चा मागे घेतील आणि इतर कोणत्याही दिवशी हा मेळावा घेण्यात येईल.
टिकैत यांनी यापूर्वी म्हटले होते की, प्रजासत्ताक दिनी शेतकरी लाल किल्ल्यापासून ते इंडिया गेटपर्यंत मिरवणूक काढतील आणि अमर जवान ज्योतीवर राष्ट्रीय ध्वजारोहण करतील. यादरम्यान, बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी असेही सांगितले की, हा कायदा संसदेने आणला आहे आणि ते तिथेच संपला पाहिजे, असे सांगितले. सरकारने हे तीन कायदे रद्द करण्याची योजना तयार करावी व एमएसपीला कायदेशीर हमी दिले पाहिजे. टिकैत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून गठित समितीपेक्षा सरकारशी बैठका करणे चांगले.
26 नोव्हेंबर 2020 पासून शेतकरी दिल्ली सीमेवर केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्याचा निषेध करत आहेत. गतिरोध सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत आठ फेऱ्या झाल्या आहेत. आज चर्चेची नववी फेरी झाली आतापर्यंत कोणतेही महत्वपूर्ण यश नाही. सुप्रीम कोर्टाकडून गठित केलेल्या तज्ज्ञ समितीवरील वादाच्या दरम्यान आज ही बैठक झाली. कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या मते, अद्याप कोणत्याही प्रस्तावावर सहमती झाली नाही. त्याचबरोबर ते म्हणाले की आज शेतकरी संघटनांशी झालेला संवाद निर्णायक नाही. आम्ही 19 जानेवारी रोजी पुन्हा चर्चा करू. संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. थंडीच्या परिस्थितीत शेतकरी निषेध करत असल्याची चिंता सरकारला आहे.
8 जानेवारी रोजी आठव्या फेरीच्या बैठका झाल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान पुढील आदेश होईपर्यंत तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली आणि गतिरोध सोडविण्यासाठी चार सदस्यांचे पॅनेल नेमले. भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमधून बाहेर पडले आहेत.
Tag-Morcha will not be held on January 26 if Supreme Court orders/Farmer leader
HSR/KA/HSR/ 15 JANUARY 2021

mmc

Related post