कोकणी माणसांनी बांबू लागवड करून आपले गाव समृद्ध करा…

 कोकणी माणसांनी बांबू लागवड करून आपले गाव समृद्ध करा…

सिंधुदुर्ग, दि. १८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात भात, नाचणी ,कुळीथ आणि वरी असली भरपूर कष्ट करूनही पुरेसा पैसा देत नाहीत. जमिनीत 17 हिस्सेदार,त्यामुळे घरे फुटली.गरिबी ही त्याच्या पाचवीला पुजलेली.पोट भरेना,कोकणातीत माणूस आळशी म्हणून त्याची हेटाळणी झाली.तो एक दिवस जागा झाला आणि रागाने उठला त्याने सरळ मुंबई गाठली.तिथल्या श्रीमंतीने नवलाईने,हुशारीने त्याचे डोळे दिपले.आणि इथेच घाम गाळून पैसे कमवायचे हे त्याने ठरविले.आणि तिथेच स्थिरावला.त्याने मुंबईत जाण्याची 200 वर्षाची परंपरा आजही कायम सुरु ठेवली आहे.पण कधी आपल्या पडीक वरकस जमिनीकडे लक्ष दिले नाही.

पण कोकण गरीब नाही आणि आळशी नाही.येथे भरपूर पैसे देणारे हिरवे सोने पिकते. मुंबईत राहून नोकरी धंदा करता येतो.आणि आपल्या भावी पेन्शनची सोय करता येते.हे आता सिद्ध होऊ लागले आहे. अनेक चाकरमानी आपल्या जमिनीत बांबू लागवड करू लागले आहेत. चीनची अर्थव्यवस्था बांबूवर चालते मग कोकणाची का नाही ?असा प्रश्नही त्याला पडू लागला आहे.बांबूची लागवड करून गल्लेलोट पैसा कमवता येतो.

कोकणातील निसर्ग ,येथील भूमी सह्याद्री पट्ट्यातील लांजा संगमेश्वर राजापूर, वैभववाडी, कणकवली .
कुडाळ ,सावंतवाडी परिसरातील सुपीक जमीन आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.पण त्या साठी एक करावं लागेल.वर्षानुवर्षे हरियाली सारखी जखडून असलेली नाकोरी मुळासकट उखडून टाकावी लागेल. कोकणच्या विकासाला आड ठरेल असा” पण “शब्द कायमचा पुसून टाकावा लागेल तरच शक्य आहे.

सकारात्मक विचार करायला हवा जमीनीत हिस्सेदार असले तरी, त्याच जमिनीत एकत्र बांबू लागवड करून आलेले उत्पन्न वाटून घेयला हवे. त्यासाठी एक करार केला पाहिजे.या साठी जमिनीची वाटणी करायला हवीच असं नाही.या वर विचार व्हायला हवा, तरच शक्य आहे.

कोकणात बांबू लागवडीचे महत्व आता तरुण मुलांना कळू लागले आहे.इथली स्मार्ट, हुशार तरुण मुल जमिनीत बांबू लागवड करताना पहायला मिळतात.चाकरमानी तर सर्वात पुढे आहे.म्हातारी कोतारी माणसेही म्हणू लागली आहेत.होय आमका सुद्धा बांबू लावॊक हवेत.! हे शुभ संकेत मानले जातात.

पूर्वी कोकणात श्रीमंती मोजायची फुटपट्टी एकच होती.गावात चिरे बंदी, स्लॅबची घरे आणि आंबा काजूची झाडे किती ?अलिकडे ही फुटपट्टी जुनी झाली आहे आणि लोक हिशोब बाळगू लागले आहेत.
आपल्या जमिनीत बांबूची बेटे किती ?सुदैवाने कोकण प्रांताला श्रीमंतीची ओळख उशिरा का होईना ?हळू हळू पटू लागली आहे.आपल्या गावातील पडीक जमिनीत बांबू लागवड करून गाव समृद्ध करा.बांबू लागवड करताना आपल्या वाडवडिलांनी लावून ठेवलेली चिवा काठीची मूळ लावा.त्यात पैसा आहे.सध्या नर्सरीवाल्यांचे पेव फुटले आहे.नको त्या जातीची बांबू लागवड करून फसू नका.

मराठवाड्यात बल्कोवा जातीची रोप लागवड केली पण त्यांना काटा आला आहे.आंधळा दळतंय कुत्रे पीठ खातेय अशी शासनाची अवस्था आहे.अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.कोकणातील शेतकऱ्यांनी कोणत्या तरी जातीची बांबू लागवड करून फसू नये,असे आवाहन आम्ही आज जागतिक बांबू दिनानिमित्त करीत आहोत.

कोकणी माणसाच्या डोक्यात कुणीतरी प्रेरणा घालून दिली पाहिजे.एकदा डोक्यात जर का ठिणगी बसली की तो स्वतःचा उरत नाही.तो चमत्कार करून दाखविल्याशिवाय राहणार नाही.डोक्यात प्रेरणा देण्याचे काम आम्ही करीत आहोत.”कोकण -महाराष्ट्र बांबू शेतकरी “नावाचा फेसबुक ग्रुप बनवून अवघ्या कोकणात बांबू शेती कशी चालते ?हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.साडेसात सात हजार सच्चे बांबू शेतकरी आम्ही जोडले गेले आहेत.त्यात अकाउंटंट आहेत आर्किटेक आहेत .उद्योजक आहेत आणि फिल्म डायरेकटर आहेत.एक विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.आपले गाव समृद्ध करण्यासाठी कोकणी माणसांनी बांबू लागवड करा असे आवाहन आज जागतिक बांबू दिना निमित्त करीत आहोत.

ML/ML/SL
18 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *