सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देणारे सुपर App

 सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देणारे सुपर App

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जाता. आता केंद्र सरकार नवीन रेल्वे Super App आणून रेल्वे प्रवास सुलभ करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, Super ॲप सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देईल. याशिवाय रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करुन सेवांचा लाभ घेता येईल .

सध्या, प्रवासी तिकीट बुकिंगसाठी IRCTC ॲप आणि वेबसाइटचा वापर करतात आणि ट्रेनची स्थिती ट्रॅक करण्यासाठी आणि PNR तपासण्यासाठी स्वतंत्र ॲप्स वापरतात. अशा किचकट परिस्थितीमुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होते, ज्यामुळे केंद्र सरकार नवीन सुपर ॲप रेल्वे प्रवाशांसाठी आणत आहे. नवीन रेल्वे सुपर ॲपबद्दल अधिक तपशील रेल्वेमंत्र्यांनी अद्याप उघड केला नाही. पण या ॲपद्वारे वापरकर्ते ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, पीएनआर स्थिती तपासू शकतील आणि ट्रेनच्या रिअल-टाइमचा स्थितीचा अंदाज घेऊ शकतील अशी माहिती मिळत आहे. सर्व रेल्वे सेवा एकाच ॲपवर उपलब्ध करून देत प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच ॲपचे उद्दिष्ट आहे.

रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नमूद केले की, गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेचे सोयीसुविधांसह आधुनिकीकरण आणि डिजिटल सोयीवर भर देण यावर केंद्र सरकारने जोर दिला आहे. आजकाल लांब रांगा टाळून सामान्य तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट देखील ऑनलाइन खरेदी करता येत आहे. सध्या रेल्वेच्या सर्व ऑनलाइन सेवा विखुरलेल्या पण सुपर ॲप वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर बनवून या डिजीटल सेवा एकत्रित देईल.

SL/ML/SL

17 Sept 2024

17 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *