Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरी

 Tupperware ने जाहीर केली दिवाळखोरी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा लोकप्रिय ब्रँड असलेल्या Tupperware ब्रँडने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते १ अब्ज इतकी आहे. तर त्यांची देणी १ अब्ज ते १० अब्जापर्यंत वाढले आहे. जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद करून जवळपास १५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने आपली गंगाजळी कमी झाल्यामुळे भविष्यात व्यापारात टिकून राहणे अवघड असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार Tupperware ने चॅप्टर ११ अंतर्गत दिवाळखोरी जाहीर करून संरक्षण मागितले आहे.

करोना काळानंतर कंपनीच्या नफ्यात घसरण व्हायला सुरूवात झाली. लॉकडाऊन लागले, ज्यामुळे लोक ऑफीसला जात नव्हते. अशावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर किचनच्या वस्तूंची विक्री खूप कमी झाली होती. करोनाची लाट ओसरल्यानंतर प्लास्टिकच्या कच्च्या मालाचे दर वाढले. तसेच कामगारांच्या वेतन आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे तोटा वाढतच गेला.

Tupperware ची स्थापना १९४६ साली अमेरिकेत झाली होती. अर्ल टपर यांनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला Tupperware हे नाव पडले. गेली ७६ लोकप्रिय असलेल्या टपरवेअरचे डबे/ बाटल्यांचे उत्पादन लवकरच कायमच्या बंद होणार आहेत. Tupperware निर्माण केलेल्या या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. Tupperware चे जाळे १०० देशात विस्तारलेले होते.

SL/ML/SL

18 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *