एलॉन मस्क यांनी व्यक्त केली EVM च्या विश्वासार्हतेवर शंका

न्यूयॉर्क, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतात काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये इंडिया आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. त्यानंतर आता देशात EVM घ्या वापराबाबत निर्माण झालेल्या शंका दूर झाल्या आहेत. मात्र आता अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी EVM घ्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या जगविख्यात कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यानंतर आता भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांना प्रत्युत्तर दिले आहे.एलॉन मस्क हे प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर त्यावर जगभरात चर्चा होते. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या एक्स या सोशल मीडियावरून केलेल्या पोस्ट चर्चेत असतात. आता त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय निवडणुकांकडे पाहिले जात आहे.अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएमबाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टला घेऊनच एलॉन मस्क यांनी आपली शंका उपस्थित केली. अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी पुन्हा एकदा डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने येण्याची शक्यता आहे. याआधी २०२० मध्ये हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते.
SL/ML/SL
16 June 2024