अर्थव्यवस्थेतील मंदी दूर करण्यासाठी जाहीर केलेले प्रोत्साहन पॅकेज अपुरे – संसदीय समिती

 अर्थव्यवस्थेतील मंदी दूर करण्यासाठी जाहीर केलेले प्रोत्साहन पॅकेज अपुरे – संसदीय समिती

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 साथीने (covid-19 pandemic) संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळित झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढविण्यासाठी सरकारने अनेक मोठ्या प्रोत्साहन पॅकेजेसची घोषणा केली होती. परंतु एका संसदीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, साथीमुळे त्रस्त असलेल्या अर्थव्यवस्थेतील (Economy) मंदी दूर करण्यासाठी सरकारने जाहीर केलेले प्रोत्साहन पॅकेज अपुरे आहे.
उद्योगाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने कोविड-19 साथीचा (covid-19 pandemic) उद्रेक झाल्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रावर झालेल्या दुष्परिणामांविषयी आपल्या अहवालात म्हटले आहे की साथीच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसर्‍या लाटेने अर्थव्यवस्थेचे (Economy) आणि विशेषत: एमएसएमई क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

रोखीचा प्रवाह सुधारणांसारख्या उपायांवर कमी भर
Less emphasis on measures such as cash flow improvements

अहवालानुसार, समितीला आढळले की साथीचा (covid-19 pandemic) परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेच्या (Economy) पुनरुज्जीवनासाठी सरकारने घोषित केलेले पॅकेज अपूरे आहे, कारण अवलंबण्यात आलेले उपाय कर्जाचा प्रस्ताव आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजने संबंधी अधिक होते आणि तात्काळ दिलासा म्हणून मागणी निर्माण करण्यासाठी रोखीचा प्रवाह सुधारणांसारख्या उपायांवर कमी भर देण्यात आला.

मोठे आर्थिक पॅकेज आणायला हवे
A big financial package should be brought

समितीने शिफारस केली आहे की सरकारने एमएसएमईंसह (MSME) अर्थव्यवस्थेला (Economy) साथीच्या परिणांमधून बाहेर पडण्यासाठी आणि मागणी, गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी त्वरित एक मोठे आर्थिक पॅकेज आणायला हवे.

एमएसएमई कडे रोखीची टंचाई
Cash shortage to MSME

विविध एमएसएमई संघटनांनी समितीसमोर निवेदन केले आहे की व्यवसायात तीव्र घट झाल्यामुळे बहुतांश एमएसएमईंना (MSME) मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या संस्थांनी समितीला सांगितले की, अंदाजे 25 टक्के एमएसएमई कर्जाची परतफेड करण्यात चूक करु शकतात, कारण अनेक एमएसएमईंना बँकांकडून कार्यरत भांडवल काढणे कठीण जात आहे. समितीने शिफारस केली आहे की कोविड 19 साथीमुळे (covid-19 pandemic) छोट्या उद्योगांचे अस्तित्व वाचविणे आवश्यक आहे आणि यासाठी सरकारने त्यांना त्वरित आवश्यक रोख सहाय्य करायला हवे.
The entire world economy has been shaken by the Kovid plague. The government had announced a number of major stimulus packages to boost the Indian economy. But a parliamentary committee said in a report that the stimulus package announced by the government to address the recession was inadequate.
PL/KA/PL/29 JULY 2021

mmc

Related post