आर्थिक विकासाला मिळाले या क्षेत्राचे पाठबळ
नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थ मंत्रालयाने सप्टेंबरच्या आर्थिक आढाव्याचा (economic review) अहवाल जाहीर केला आहे. अहवालानुसार, गेल्या महिन्यात देशाचा आर्थिक विकास दर (growth rate) लक्षणीय वाढला आहे. लसीकरणाच्या वेगासह कोविडची दुसरी लाट कमकुवत होण्याचा फायदा त्याला मिळाला आहे. अहवालानुसार, रब्बी हंगामात गहू आणि धान्याची विक्रमी खरेदी आणि खरीप उत्पादनात संभाव्य वाढ यामुळे गावांमध्ये मागणी वाढली आहे.
चार महिन्यांत 2020 पेक्षा दोन तृतीयांश अधिक थेट परकीय गुंतवणूक
अहवालात, वार्षिक आधारावर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (FDI) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिले चार महिन्यांबाबत म्हणजेच एप्रिल ते जुलै बाबत बोलायचे तर या कालावधित देशात 2,737 कोटी डॉलरची (सुमारे 2,05,867 कोटी रुपये) परकीय गुंतवणूक आली आहे. कोविडचा वाईट परिणाम झालेल्या गेल्या वर्षापेक्षा ही थेट परकीय गुंतवणूक 62 टक्के म्हणजेच दोन तृतीयांश जास्त आहे.
भांडवली बाजारात 22,565 कोटींची परकीय गुंतवणूक
आर्थिक आढाव्याच्या (economic review) अहवालानुसार, आर्थिक सुधारणेची गती चांगली असल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारालाही पाठबळ मिळाले आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक (FPI) वाढून सुमारे 300 कोटी डॉलर (22,565 कोटी रुपये) झाली आहे. अहवालानुसार, गेल्या महिन्यात उदयोन्मुख देशांमध्ये भारताच्या शेअर आणि रोखे बाजारात परकीय गुंतवणूकदारांची गंतवणूक सर्वाधिक झाली आहे.
एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 54,155 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक
जर आपण या आर्थिक वर्षाची म्हणजे एप्रिल ते सप्टेंबरच्या अखेरीची आकडेवारी पाहिली तर ब्राझीलनंतर सर्वात जास्त परकीय गुंतवणूक येथील भांडवली बाजारात आली आहे. आर्थिक आढाव्यानुसार (economic review), या आर्थिक वर्षात आतापर्यंत येथील शेअर आणि रोखे बाजारात सुमारे 720 कोटी डॉलरची (54,155 कोटी रुपये) परकीय गुंतवणूक झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ब्राझीलच्या बाजारपेठांमध्ये सुमारे 900 कोटी डॉलर (67,695 कोटी रुपये) गुंतवले आहेत.
कृषी क्षेत्राच्या जास्त विकास दरामुळे खेड्यांमध्ये खप वाढला
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दर महिन्याला जाहीर होणाऱ्या हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्स (आर्थिक अहवाल आणि निर्देशांक) नुसार, आर्थिक विकास दरात (growth rate) सर्वांगीण वाढ होत आहे, म्हणजेच त्याचे संकेत कमी अधिक प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात दिसत आहेत. मंत्रालयाचे म्हणणे आहे की सप्टेंबरमध्ये कृषी क्षेत्राच्या विकास दरात (growth rate) वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागात खप वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, कृषी अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांमुळे एफएमसीजीपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्रापर्यंत चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
The finance ministry has released its September economic review report. According to the report, the country’s economic growth rate has increased significantly in the last month. It has the advantage of weakening the second wave of covid with the speed of vaccination. According to the report, record purchases of wheat and cereals during the rabi season and a potential increase in kharif production have boosted demand in the villages.
PL/KA/PL/12 OCT 2021