एकनाथ शिंदेंकडून कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा…
पंढरपूर दि २ :- कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजेला उपस्थित राहण्याचा मान यंदा प्रथमच देण्यात आला.
आषाढी नंतर कार्तिकी अशा दोन्ही एकादशीला महापूजा करणारे एकनाथ शिंदे हे मानकरी ठरले आहेत. शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा केली. कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, बळीराजाला सुखी कर, महाराष्ट्र राज्य पहिल्या नंबरवर येऊ दे. असे साकडे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले.
एकादशीची सुरुवात होताच चंद्रभागेच्या तटावर भाविकांनी स्थानासाठी मोठी गर्दी केली. तसेच नगरपरिषेक शाळा मार्गावर देखील भाविक सकाळपासूनच दिंड्या घेऊन निघाले होते.ML/ML/MS