दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा…
जालना, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी यावेळी केली. 29 मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळालेल्या फळबागा घेऊन धडक मोर्चा काढला होता.
जिल्हा प्रशासनाने 3500 हेक्टर वरील फळबागांचा अहवाल शासनाकडे सादर केलाय. मात्र दुष्काळामुळे 43 हजार हेक्टरवरील फळबागांना नुकसान झालंय त्यापैकी 20/25 हजार हेक्टर वरील फळबागा जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान शासनाने या नुकसानीचे पंचनामे अद्याप केले नाही. शासनाचे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जालना जिल्ह्यातल्या जळालेल्या फळबागांचे शासनाने जर लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर केली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दुष्काळ आणि हकबल शेतकऱ्यांनी दिला आहे.
Drought-stricken farmers march
ML/ML/PGB
10 Jun 2024