६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

 ६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून विधानसभेपाठोपाठ लोकसभेत एन्ट्री केली आहे. लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. तब्बल ६० वर्षांनंतर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाल्या आहेत.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५१ ला संपूर्ण देशभरात पहिला लोकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून चंद्रपूर लोकसभेत १२ महिलांनी निवडणूक लढवली आहे. यामध्ये १९६४, १९६७ मध्ये ताई कन्नमवार, १९८९, १९९१ मध्ये ज्येष्ठ गौरी भवसार, १९९६, १९९८ मध्ये सत्यशीला रायपुरे यांनी दोनदा निवडणूक लढवली आहे, तर १९८० मध्ये प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ जयश्री इंगळे, १९८९ उर्मिला पाठक, १९९१ वीरा सिर्गेवार, १९९९ शोभा पोटदुखे, २००४ तायरा शेख, २०२४ मध्ये प्रतिभा धानोरकर, पौर्णिमा घोनमोडे, वनिता राऊत यांनी निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी १९६४ च्या पोटनिवडणुकीत ताई कन्नमवार, तर २०२४ च्या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळविला आहे.

ML/ML/PGB 9 jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *