कोणी मेलं का? नोएडात लॅम्बोर्गिनीच्या चालकाने मजुरांना उडवल्यावर विचारला प्रश्न!

नोएडाच्या सेक्टर ९४ मध्ये फूटपाथवर बसलेल्या दोन मजुरांना रविवारी भरधाव लॅम्बोर्गिनी कारने धडक दिली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गाडी चालवणाऱ्या दीपक नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडी जप्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेच्या बांधकाम मजुरांना उडवल्यानंतर त्याने “मी तर हळूच एक्सलरेटर दाबला होता, कुणी मेलं का?” असा उलट प्रश्न इतर मजुरांना केला. पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ही गाडी युट्यूबर मृदूल तिवारीच्या नावावर असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी मृदूलली चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.