अवकाळी पावसामुळे देवगड हापूस आंबा नुकसानीत

 अवकाळी पावसामुळे देवगड हापूस आंबा नुकसानीत

सिंधुदुर्ग, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .Devgad Hapus mango damaged due to untimely rains जिल्ह्यात ठिकठिकाणी आंब्याची झाडे मोडून पडली आहेत त्यामुळे आंबा पीक नुकसानीत जाणार आहे .

आंबा पीक येण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत या अवकाळी पावसामुळे मातीमोल झाली आहे. The unseasonal rains have eroded the year-round efforts of the mango crop. गळून पडलेल्या आंब्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी महिना वगळला तर पावसाळ्यानंतर प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो आहे . यामुळे मोहोर गळणे , आंबे झाडासह जमीनदोस्त होणे , करपा रोगाचा प्रादुर्भाव होणे यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे .

देवगड हिंदळे येथील राणे कुटुंबीयांच्या मालकीची हापूस आंब्यांची झाडे अशीच मोडून पडली असून त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदार सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.Devgad Hapus mango damaged due to untimely rains

ML/KA/PGB

7 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *