दलाल स्ट्रीटवर(Dalal Street) बुल्सची घट्ट पकड.

 दलाल स्ट्रीटवर(Dalal Street) बुल्सची घट्ट पकड.

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत

नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात मजबूत झाली व संपूर्ण आठवडा बाजारात सकारात्मकता जाणवली. बाजाराने आपली मनोवैज्ञानिक पातळी ओलांडली. सेन्सेक्स ६१,००० व निफ्टीने १८,००० च्या वर जाण्यात यश मिळवले (indices crossed major hurdles).देशातील महागाईमध्ये झालेली प्रचंड वाढ, ओमिक्रॉनचे वाढते रुग्ण,अमेरिकेतील महागाईने चार दशकांचा गाठलेला उच्चांक अशी पार्श्वभूमीअसताना देखील बाजरात सकारत्मकता होती. चांगल्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.फेडचे चेअरमन पॉवेल यांनी व्याजदर वाढविण्याबाबत किंवा बॉण्ड बाईंग कार्यक्रमासाठी अजून २/४ मीटिंग करावयास लागतील असे सांगितल्याने बाजाराला दिलासा मिळाला या सगळ्याचा परिणाम दलाल स्ट्रीटवर दिसला.

या आठवड्यात जाहीर झालेल्या किरकोळ किमतीवर आधारित महागाई (CPI) दरामध्ये प्रचंड वाढ झाली महागाई दराने सहा महिन्याचा उच्चांक गाठला. डिसेंबर मध्ये दर वाढून ५. ५९ % वर पोहोचला. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यातील औद्योदिक उत्पादनात (Industrial Production) १.४ % वाढ झाली.परंतु हि वाढ नऊ महिन्यातील निच्चांकी स्तर गाठणारी होती. शुक्रवारी जाहीर झालेला डिसेंबर मधील घाऊक महागाई दर १३.५६ टक्के नोंदविला गेला.
Budget session ची सुरुवात ३१ जानेवारी रोजी सुरु होणार असून ते ८ एप्रिल पर्यंत चालेल.केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होईल.

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून १७ जानेवारी रोजी होणाऱ्या बँक ऑफ जपानच्या मॉनेटरी पोलिसी स्टेटमेंट तसेच विदेशी गुंतवणूकदारांचे((FII) खरेदी/विक्रीचे आकडे या कडे असेल.सोमवारी अमेरिकेमधील बाजार बंद असतील. मार्केटचा तांत्रिक दृष्ट्या ट्रेंड (technical trend) हा वरती जाण्याच्या (Bullish Trend /upward trend) आहे परंतु मार्केट हे ओव्हरबॉट असल्याने. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.

निफ्टीने १८,००० चा स्तर पुन्हा गाठला.Nifty regains 18,000

नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात मजबूत झाली. जागतिक बाजार संमिश्र असून सुद्धा भारतीय बाजाराची सुरुवात वरच्या दिशेने झाली.BSE सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६०,००० एकदा पार केला. तसेच दिवसभरात निफ्टीने आपली १८,००० ची मनोवैज्ञानिक पातळी ओलांडली. बाजारातील तेजीची प्रमुख कारणे म्हणजे तिसऱ्या तिमाहीत बँकिंग तसेच आय.टी क्षेत्रातील कपन्यांचे निकाल चांगले येतील अशी आशा,रिअल इस्टेट कंपन्यांनी जाहीर केलेले विक्रीचे आकडे चांगले आल्याने येणाऱ्या काळात ह्या सेक्टरमध्ये ग्रोथ होईल हि आशा.तसेच तांत्रिक दृष्ट्या बाजार वरच्या दिशेने जाईल हे संकेत. १७ नोव्हेंबर नंतर प्रथमच निफ्टीने १८,००० चा आकडा पार केला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६५० अंकांनी वधारून ६०,३९५ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १९० अंकांची वाढ घेउन १८,००३ चा बंददिला.

सेन्सेक्स सलग तिसऱ्या सत्रात वधारला. Sensex gains for third session

Information technology, power आणी realty क्षेत्रातील खरेदीच्या जोरावर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा माहोल होता. जागतिक बाजारातील कमजोरीमुळे बाजाराची सुरुवात नरमाईने झाली होती. दिवसभर बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत होता.निफ्टीने १८,००० च्या वर बंद देण्यात यश मिळवले. बाजार बंद होताना सेन्सेक्स २२१ अंकांनी वधारून ६०,६१६ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ५२ अंकांनी वधारून १८,०५५ चा बंददिला. Sensex, Nifty Log Gains For Third Day Aided By I.T., Power Stocks.

दलाल स्ट्रीटवर बुल्सची घट्ट पकड. Bull holds a tight grip on D-St

नवीन वर्षात बुल्सनी बाजरावर चांगलीच पकड घेतल्याचे दिसत होते. सलग चवथ्या दिवशी बाजारात उत्साहाचे वातावरण होते. निफ्टीने दिवसभरात१८,२०० चा टप्पा पार केला. सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची वाढ झाली. गेल्या काही दिवसात गुंतवणूकदारांची जोखीम पत्करण्याची क्षमता वाढली असल्याचे दिसून आले. लोकांची नव्या विषाणूबाबतची भीती हळूहळू कमी झाली.तसेच मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रुग्णसंख्या घातल्यामुळे बाजार आश्वासक झाला.तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली तसेच जास्तीत जास्त लोक लसवंत झाल्याने बाजारात तेजीचा वावर वाढला. मंगळवारी फेडचे चेअरमन पॉवेल यांनी व्याजदर वाढविण्याबाबत किंवा बॉण्ड बाईंग कार्यक्रमासाठी अजून २/४ मीटिंग करावयास लागतील असे सांगितल्याने बाजाराला दिलासा मिळाला. बुधवारी बाजारात सगळ्या क्षेत्रात तेजी पाहावयास मिळाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५३३ अंकांनी वधारून ६१,१५० या स्तरावर बंद झाला व निफ्टीने १५६ अंकांनी वधारून १८,२१२चा बंददिला.

सलग पाचव्या दिवशी तेजी Sensex, Nifty Log Gains For Fifth Day

गुरुवारी बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार होते. दिवसभर बाजार हलकी तेजी व मंदी यात फिरत होता पण बाजारात सकारात्मकता होती.metal, pharma, आणि power या क्षेत्रात खरेदी दिसली. banking क्षेत्रात थोडी नफावसुली झाली.. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८५ अंकांनी वधारून ६१,२३५ या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ४५ अंकांनी वधारून १८,२५७ चा बंददिला.

बाजार सपाट बंद झाले.Market ends flat

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजरीची सुरुवात घसरणीने झाली (gap-down opening in the morning). परंतु दुपारनंतर बाजार रिकवर झाला. जागतिक बाजार नरम होते. US producer’s price index (PPI) खाली आल्याने,jobless claims वाढल्याने व United Nationsने भारताची GDP growth कमी केल्याने बाजारावर दबाव होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स १२ अंकांनी घसरून ६१,२२३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २ अंकांनी घसरून १८,२५५ चा बंददिला.Dalal Street.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

15 Jan 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *