cyclone Asani Updates: चक्रीवादळ ‘असनी’धडकणार, अतिवृष्टीचा इशारा, अनेक उड्डाणे रद्द
नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : असनी चक्रीवादळाचा आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर प्रभाव दिसून येईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगाल आणि ओडिशाच्या सागरी भागात 90 ते 125 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. यादरम्यान अनेक ठिकाणी पाऊसही पडेल. या वादळाचा प्रभाव बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्येही राहील. 11 ते 13 मे या कालावधीत येथे पाऊस पडेल, तसेच जोरदार वारे वाहतील.
दरम्यान, खराब हवामानामुळे मंगळवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम विमानतळावरून 23 उड्डाणे टेक ऑफ आणि लँडिंग रद्द करण्यात आली आहेत. त्याचवेळी चेन्नई विमानतळानेही 10 उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम, जयपूर आणि मुंबईला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
हवामान केंद्र भुवनेश्वरने सांगितले की, असनी चक्रीवादळ गेल्या 6 तासांत 5 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले. हे सध्या पुरीच्या नैऋत्य-पश्चिमेस सुमारे 590 किमी आणि गोपाळपूर, ओडिशाच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 510 किमी आहे.
असनी चक्रीवादळ 10 मेच्या रात्रीपर्यंत वायव्य दिशेने पुढे सरकणार आहे. त्यानंतर ते ओडिशा किनार्यापासून ईशान्येकडे वायव्य बंगालच्या उपसागराकडे वळेल. येत्या 24 तासांत ते कमकुवत होण्याची शक्यता आहे.
HSR/KA/HSR/10 MAY 2022