कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर

 कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर सोमवारी अडीच वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. सकाळच्या व्यापारात कच्चे तेल प्रती बॅरल 76.60 डॉलरने विकले गेले, जे नंतर घसरुन प्रती बॅरल 75.98 डॉलरवर बंद झाले.
तेल दलाल पीव्हीएमचे विश्लेषक स्टीफन ब्रेनॉक यांचे म्हणणे आहे की संक्रमणातील सुधारणा, वेगवान लसीकरण आणि उन्ह्याळ्यातील इंधनाची वाढती मागणी लक्षात घेता किंमती आणखी वाढू शकतात. कच्च्या तेलात (Crude Oil) सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली आहे आणि ऑक्टोबर 2018 नंतर किंमत सर्वाधिक झाली आहे.

उत्पादन वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते
was promised to increase Production

मात्र अमेरिकन कच्चे तेल (Crude Oil) प्रति बॅरल 73.95 डॉलरवर विकले जात आहे. तेल निर्यात करणार्‍या देशांची संघटना (ओपेक) आणि इतर सहयोगी देशांनी उत्पादन कमी केले, त्यामुळे किंमती वेगाने वाढत आहेत. तथापि, किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ओपेकने मे ते जुलैदरम्यान उत्पादन दररोज 21 लाख बॅरल वाढवण्याचे आश्वासन दिले होते.

जुलैपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा
Expect relief from July

ओपेक आणि अन्य सहयोगी संघटनांच्या एक जुलैला होणार्‍या बैठकीत तेल उत्पादन वाढविण्याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा जागतिक क्रूड ब्रोकर एएनजी आणि आयएनजी यांनी व्यक्त केली आहे. ऑगस्टपासून त्यात दररोज 5 लाख बॅरलची वाढ अपेक्षित आहे. या निर्णयामुळे कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर खाली येण्यास मदत होईल.
 
crude oil prices in International market hit a two-and-a-half-year high on Monday. In the morning trade, crude oil traded at 76.60 doller per barrel, which then fell to close at 75.98 doller per barrel. Stephen Branok, an analyst at oil broker PVM, said prices could rise further given improved transition, faster vaccinations and increased demand for summer fuel.
PL/KA/PL/29 JUNE 2021
 

mmc

Related post