केंद्रिय वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्थेसाठी 6,28,993 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा.

 केंद्रिय वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्थेसाठी 6,28,993 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा.

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्य स्थितीत सूरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध क्षेत्रांसाठी एकत्रितरित्या सहा लाख अठ्ठावीस हजार नवशे त्र्याण्णव (6,28,993)कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.
वित्त मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. केंद्रिय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर हेही यावेळी उपस्थित होते. आजच्या पॅकेज मध्ये आठ अर्थिक मदत उपाययोजना जाहीर करण्यात आल्या असून त्यातील चार पूर्णतः नवीन तर एक आरोग्यविषयक सुविधांसाठी आखण्यात आली आहे. वित्त मंत्र्यांनी 1.1 लाख कोटी रुपये हे कर्जासाठी हमी योजना म्हणून कोविड ने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी घोषित केले आहेत. त्यातले 50 हजार कोटी केवळ आरोग्य विभागासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विविध शहरांमध्ये आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे त्याचबरोबर काही नवीन प्रकल्प उभारणे यासाठी याचा वापर करता येणार आहे. The Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has been extended from 30 June 2021 to 31 March 2022. The finance minister said at a press conference that the central government would bear Rs 93,869 crore for each five kg of free foodgrains provided under the Prime Minister’s Poor Welfare Food Scheme between May and November 2021.
वित्तमंत्र्यांनी तातडीच्या कर्ज उभारणीसाठी हमी योजनेला 1.5 कोटी आत्मनिर्भर योजने अंतर्गत दिले आहेत. कर्ज हमी योजनेअंतर्गत 25 लाख लोकांना एम. एफ. आय. अंतर्गत (छोट्या वित्तीय संस्था) कर्ज मिळू शकणार आहे. पर्यटन क्षेत्राला मदत करण्याच्या दृष्टीने आजच्या घोषणेत स्थान देण्यात आले असून अकरा हजार टुरिस्ट गाईड आणि पर्यटन विभागाशी संबंधित लोकांना याचा थेट लाभ होणार आहे. प्रत्येक टुरिस्ट एजन्सिला 10 लाख रुपये पर्यंत तर नोंदणकृत टुरिस्ट गाईडना प्रत्येकी एक लाख रुपये पर्यंत शंभर टक्के कर्जाची हमी देण्यात आली आहे. याशिवाय एका विशेष योजने अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत भारतात पर्यटन अथवा कामानिमित्त व्हिसा घेऊन येणाऱ्या पहिल्या पाच लाख परदेशी नागरिकांना व्हिसा रकमेतून शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत 30 जून 2021 वरून 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत मे ते नोव्हेंबर 2021 या दरम्यान देण्यात येणाऱ्या प्रत्येकी पाच किलो मोफत धान्यासाठी 93,869 कोटी इतका खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे वित्तमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
The Finance Minister has given Rs 1.5 crore under the self-reliance scheme to the emergency loan guarantee scheme. Under the loan guarantee scheme, 25 lakh people will get M.P. F. Income. Internal (small financial institutions) loans will be available. Today’s announcement is aimed at helping the tourism sector and will directly benefit 11,000 tourist guides and people associated with the tourism sector. Each tourist agency is guaranteed a loan of up to Rs 10 lakh, while registered tourist guides are guaranteed a loan of up to Rs 1 lakh each. In addition, under a special scheme, the first five lakh foreign nationals coming to India on tourist or work visas by March 31, 2022 will be given a 100 per cent rebate from the visa amount.
ML/KA/PGB
28 Jun 2021

mmc

Related post