जगभरात कच्च्या तेलाचा वापर वाढला, दर कमी होण्याची शक्यता कमी

 जगभरात कच्च्या तेलाचा वापर वाढला, दर कमी होण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर पहिल्यांदाच प्रती लिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारात कच्च्या तेलाची (Crude Oil) किंमत वाढणार असल्याने येत्या काही दिवसांत हे दर कमी होण्याची शक्यता नाही.

आर्थिक घडामोडींमुळे वापर वाढला

गुंतवणूक बँक गोल्डमन सॅश यांनी सांगितले की यावर्षी जुलै पर्यंत कच्च्या तेलाचा (Crude Oil) वापर कोविडपूर्व (Pre-Covid) पातळीवर जाईल. कारण कोरोना (Corona) प्रकरणात घट होण्याच्या दरम्यान औद्योगिक घडामोडी सातत्याने वाढत आहेत. तेल उत्पादक गट ओपेक प्लस (OPEC+) आणि इराणद्वारे तेल उत्पादनातली कपात सुरूच आहे. अशा परिस्थितीत, कच्चे तेल प्रति बॅरल 10 डॉलर आणखी महाग होऊ शकेल.

तीन महिन्यांत कच्चे तेल प्रति बॅरल 10 डॉलरने महगणार

वाढ झाल्यानंतर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल-70 -75 पर्यंत जाईल. ते 22 फेब्रुवारीला सकाळी ते प्रति बॅरल 63.11 डॉलरवर आहे. गोल्डमॅन सॅश च्या मते, यावर्षी कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकी सरकार सध्या इराणला तेल उत्पादनात वाढ करायला देणार नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील.

सरकारनेही चिंता व्यक्त केली

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही रविवारी सांगितले की, इंधन दरवाढीची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने इंधनाचे उत्पादन कमी केले आहे आणि दुसरे म्हणजे जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादक देश इंधनाचे कमी उत्पादन करत आहेत. यामुळे ग्राहक देशांना अडचणी येत आहेत.
22 फेब्रुवारीला सलग दुसर्‍या दिवशी देशात इंधनाचे दर स्थिर राहिले. राजधानी दिल्लीत पेट्रोल 90.58 रुपये प्रती लिटर आणि डिझेल 80.97 रुपये दराने विकले जात आहे.
PL/KA/PL/22 FEB 2021

mmc

Related post