पावसाअभावी सुकू लागली पिके; शेतकऱ्यांची वाढली चिंता

वाशिम, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाअभावी आतापर्यंत तग धरून असलेले सोयाबीन पीक आता खराब होऊ लागले आहे. तर पावसाने दिलेल्या दडीने जबरदस्त फटका खरीप पिकांना बसला असून येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातातून ही पिके जाणार असल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यातील सर्वच भागात दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
यावर्षी पावसाळ्यातील जून महिना हा पूर्णत: कोरडा गेल्याने खरीपातील पेरणीला एक महिना उशीर झाला. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिके नुकतीच बहरली होती. मात्र ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेल्याने ऐन बहरात असलेल्या खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबिन आणि तूर पिकाने आता माना टाकल्या आहेत. त्यामुळे यंदा वाशीम जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ML/KA/SL
6 Sept. 2023