कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ
मुंबई, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील कोरोना साथीच्या (corona pandemic) पुनरागमनाचा एप्रिल-मे दरम्यान अर्थव्यवस्थेवर (Economy) वाईट परिणाम झाला. कारण संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रमुख राज्यांमध्ये ठिकठिकाणी कडक निर्बंध लादले गेले होते. यामुळे आर्थिक घडामोडींचा वेग मंदावला. मात्र सवलतींमुळे आता सुधारणा दिसून येऊ लागली आहे.
ई-वे बिल निर्मितीत सुधारणा झाल्यामुळे आर्थिक पुनर्प्राप्तीची अपेक्षा
Expect financial recovery due to improvement in e-way bill generation
मे महिन्यात जीएसटी (GST) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वे (ई-वे) बिल निर्मिती (E way Bill Generation) एका वर्षातील नीचांकी पातळीवर आली होती. मात्र सरकारच्या निर्बंधावरील सवलतींमुळे जूनमध्ये ही आकडेवारी सुधारत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांत ई-वे बिल संकलन 3.28 कोटी होते, जे मेच्या याच कालावधीत 2.45 कोटी होते. म्हणजेच बिल निर्मितीत 34.4 टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. दर दिवसाच्या दृष्टीने जूनमध्ये बिल निर्मितीच्या आकड्यातही सुधारणा झाली आहे. महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात प्रतीदिन सरासरी 16.88 लाख बिले तयार करण्यात आली आहेत जी मे मध्ये 12.22 लाख होती.
20 दिवसांत ई-वे बिल निर्मिती सुमारे 11 लाख कोटी रुपये
E-way bill generation in 20 days is around Rs 11 lakh crore
मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर जूनच्या 20 दिवसांत ई-वे बिल निर्मिती (E way Bill Generation) 10.58 लाख कोटी रुपये होती, जी मेच्या याच कालावधीत 8.79 लाख कोटी रुपये होती. ही आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे ई-वे बिल निर्मितीचा आकडा कमकुवत होऊ लागला होता. मार्चमध्ये बिल निर्मिती 6.72 कोटी होती, एप्रिलमध्ये घटून ती 5.73 कोटी आणि मे मध्ये 3.95 कोटी होती. परंतू सातत्याने मिळत असलेल्या सवलतींमुळे जूनमध्ये हा आकडा सुधारत आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 मधील ई-वे बिल निर्मिती कमी होती
E-way bill generation in 2020-21 was lower than the previous financial year
संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मधील ई-वे बिल निर्मितीच्या (E way Bill Generation) आकडेवारीवर नजर टाकली तर ती 61.68 कोटी होती, जी 2019-20 मध्ये 62.88 कोटी होती. हीच आकडेवारी गेल्या तीन वर्षांच्या दृष्टीने पाहिली तर 21 मार्च 2021 पर्यंत सुमारे 180 कोटी ई-वे बिले तयार करण्यात आली.
The return of the corona pandemic in the country had a detrimental effect on the economy during April-May. This is because strict restrictions were imposed in some places in major states to prevent the spread of the infection. This slowed down the pace of economic developments. However, due to the concessions, improvement is now visible.
PL/KA/PL/26 JUNE 2021