भांडवली बाजारातील (Stock Market) प्रचंड उतार चढवानंतरही सेन्सेक्स व निफ्टीने दिला विक्रमी बंद भाव

 भांडवली बाजारातील (Stock Market) प्रचंड उतार चढवानंतरही सेन्सेक्स व निफ्टीने दिला विक्रमी बंद भाव

मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर विदेशी गुंतवणूकदारांची(FII) विक्री,सरकारी बँकाचे खाजगीकरण,एकाच दिवशी लाखो व्यक्तींना लसीकरण करण्याचाविक्रम,मूडीजने ((Moodys)भारताच्या विकास दरात केलेली घट,मंथली एक्सपायरी,रुपयाची घसरण,रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा(AGM) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी.Sensex and Nifty hit record highs despite huge fluctuations in the stock market
प्रचंड उतारचढावा नंतर बाजाराने घेतली बढत. Sensex, Nifty Close Higher After A Volatile Session
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात वैश्विक बाजारातील संकेताप्रमाणे नरमाईने झाली. सेन्सेक्स ५००अंकांनी घसरला, डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरुवात देखील कमजोरीने झाली व बाजारावर दबाव वाढला. अमेरिकन फेडच्या पॉलिसी नंतर वैश्विक बाजरात कमजोरी वाढली आहे.सुरुवातीच्या घसरणीनंतर खालच्या स्तरावरून बाजारात चांगलीच रिकव्हरी दिसली.पुढच्या टप्प्यातला लसीकरणाचा कार्यक्रम हा १८ वर्षावरील व्यक्तींना मोफत असल्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधार होईल या आशेने खालच्या स्तरावरून बाजार वधारला.दिवसाच्या खालच्या पातळीवरून सेन्सेक्स ८०० अंक सुधारला.सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओव्हरसीस बँक यांचे खाजगीकरण होईल या बातमीने सरकारी बँकात तेजी होती. (The Nifty PSU Bank index ended higher amid reports that Central Bank of India and Indian Overseas Bank might beprivatized). कामकाजाच्या शेवटी सेन्सेक्सने २३० अंकांची बढत घेतली व ५२,५७४.४६ च्या स्टारवरती बंद झाला व निफ्टीने ६३ अंकांची बढत घेऊन १५,७४६ चा बंद भाव दिला.. Market bulls were back on Dalal Street, reversing the steep losses logged in the morning, amid board-based buying.
सेन्सेक्सने गाठला ५३,००० चा टप्पा परंतु वरच्या स्तरावर तेजी विरली,बाजाराने दिला सपाट बंद. Sensex ends flat with positive bias
अमेरिकन मार्केटमधील शानदार तेजी,आशियाई बाजाराची जोरदार सुरुवात, सोमवारी एकाच दिवशी ८४ लाख व्यक्तींना लसीकरण करण्याचा विक्रम तसेच १८ मार्च नंतर कोरोना  रुग्णबाधितांचे आलेले सर्वात कमी आकडे  या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजाराची सुरवात तेजीने झाली. .सेन्सेक्सने पुन्हा एक नवीन उच्चतम  स्तर गाठला व प्रथमच ५३,००० चा आकडा पार केला. सेन्सेक्सने ५३०५७ चा नवीन विक्रमी स्तर गाठला रुपयाची घसरण मात्र सुरूच होती २८ एप्रिल नंतर रुपयाने आपला डॉलरच्या तुलनेतला तळ गाठला. कामकाजाच्या शेवटी मार्केटमध्ये  प्रचंड उतार चढाव होता व त्यामुळॆ तेजी हवेत विरली व नफावसुली झाल्याने  बाजार बंद होताना सपाट राहिला. ऑटो सेक्टर मध्ये,खास करून मारुती मध्ये चांगलीच वाढ झाली ५ महिन्यातील उत्तम वाढ झाली.आय टी तसेच इन्फ्रा सेक्टर मध्ये हि तेजी होती.बाजार बंद होताना सेन्सेक्स ५२,५८८ व निफ्टी १५,७७२ ह्या स्तरावरती बंद झाले Sensex ends flat with positive bias, Nifty closes at 15,772. Market erases gains to end flat amid volatility.
सेन्सेक्स व निफ्टीत वरच्या स्तरावर नफावसुली. Sensex, Nifty End Lower On Profit Booking At Record Levels.
सुस्त विदेशी संकेत व एफ.आय.आयच्या (Foreign Institutional Investor (FII)) सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळे बाजारावर बुधवारी दबाव वाढला. सुरुवात तेजीने झाली परंतु वरच्या स्तरावर बाजारावर दबाव होता.ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने ((Moodys) २०२१ या कॅलेंडर वर्षासाठीच्या भारताच्या  विकास दरात 13.9%वरून9.6% अशी घट केली.अदानी पोर्ट्सचे शेअर्स मध्ये २% हून  अधिक घसरले,म्यानमार प्रोजेक्ट मधील नॉर्वेतील सगळ्यात मोठा पेन्शन फंड के.एल.पी(KLP)बाहेर पडल्यामुळे हि घसरण झाली. दिवसभरात सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला. व निफ्टीने १५,७०० च्या खाली बंद दिला.२१व २२ जून रोजी एफ.आय.आयने भारतीय बाजारात २,००० करोड रुपयांपेक्षा अधिक विक्री केली. In the volatile session, markets end near the day’s low with Nifty below 15,700.
जून महिन्याच्या मंथली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात तेजी. Markets end in the green on the monthly expiry session
गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. बाजार उघडताच सेन्सेक्सने १४५ अंकांची बढत घेतली. बुधवारी मार्केटमध्ये पडझड झाली असताना सुद्धा,जून महिन्याच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केट मध्ये तेजी पसरली.रिलायन्स कंपनीची सर्वसाधारण सभा (AGM) होती, सभेपूर्वी Fitch या रेटिंग एजन्सीने Foreign-Currency रेटिंग वाढवली. बाजाराच्या तेजीला INFOSYS, TCS, ICICI BANK आणि HDFC BANK यांनी हातभार लावला. रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.मुकेश अंबानी यांनी रिलायन्स  समूहाच्या विस्तारासंबंधी अनेक योजनांची घोषणा केल्या परंतु  रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. IT, banks, metals या क्षेत्रात तेजी होती व energy, oil & gas, power,या क्षेत्रात मंदी होती.सेन्सेक्स ३९२ अंकांनी वधारला व ५२,६९९ या स्तरावर बंद झाला तसेच निफ्टीने १०३अंकांची बढत घेऊन १५७९० चा बंद दिला. Sensex, Nifty end higher; mid & smallcaps underperform.
जुलै सिरीजच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात तेजीने. Markets started the July F&O series with impressive gains.
विदेशी बाजारातील मजबूत संकेत ,अमेरिकेतील Infrastructure Deal वर झालेल्या सहमतीने तेथील बाजारातील तेजी तसेच आशियाई बाजारातील तेजीमुळे जुलै सिरीजच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात मजबुतीने झाली. ऑटो शेअर्स मध्ये आणि मेटल शेअर्स मध्ये चांगलीच तेजी होती. रशियाने  (RUSSIA )एक्स्पोर्ट टॅक्स लावल्याने मेटल शेअर्स चमकले. .RIL समूहाने सप्टेंबर पर्यंत,गणेश चतुर्थीला जगातील सगळ्यात स्वत फोन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे जाहीर केले.रिलायन्स कंपनीच्या सर्वसाधारण सभेनंतर  (AGM)अनेक घोषणा होऊन सुद्धा  गुंतवणूकदार निराश झाले  दोन दिवसात 1.3 लाख करोड रुपयांची मार्केट कॅप कमी झाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. Markets started the July F&O series with impressive gains as hefty buying in metals, financials, and pharma sectors lifted indices for the second day.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
Strong signals from overseas markets, the agreement on the US Infrastructure Deal, the rally in the US market, and the rally in the Asian market led to a strong start on the first day of the July series. Auto stocks and metal stocks had good gains. Metal shares shine as Russia (RUSSIA) imposes the export tax.RIL Group announces extending Ganesh Chaturthi to the world’s largest number of phone customers by September. C
JS/KA/PGB
26 Jun 2021

mmc

Related post