गुंतवणूकदार पुन्हा वळले इक्विटी म्युच्युअल फंडाकडे

 गुंतवणूकदार पुन्हा वळले इक्विटी म्युच्युअल फंडाकडे

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाचा (corona) परिणाम झालेल्या म्युच्युअल फंडावरील (Mutual Funds) गुंतवणूकदारांचा विश्वास आता परतला आहे. त्यामुळेच मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity mutual funds) 9,115 कोटी रुपयांची निव्वळ आवक म्हणजेच निव्वळ गुंतवणूक झाली आहे. मागील 9 महिन्यांत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये निव्वळ आवक होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. जुलैपासून आतापर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडामधून निव्वळ बहिर्गमन म्हणजेच पैसे काढण्यात येत होते.

फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांनी 52,528 कोटी रुपये काढले
Investors withdraw Rs 52,528 crore in February

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या ताज्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात डेट म्युच्युअल फंडातून 52,528 कोटी रुपये काढले होते तर फेब्रुवारी 2021 मध्ये 1,735 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात 4,090 कोटी रुपयांच्या निव्वळ आवक पेक्षा एकूण म्युच्युअल फंड उद्योगातील निव्वळ जावक 29,745 कोटी रुपये होती. फेब्रुवारी महिन्यातील 4,534 कोटी रुपयांच्या जावक पेक्षा मार्च महिन्यात इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड ओपन-एण्डेड योजनांमधील आवक 9,115 कोटी रुपये होती. गेल्या महिन्यात मल्टी कॅप आणि व्हॅल्यु फंड वगळता सर्व श्रेणींमध्ये आवक झाल्याचे पहायला मिळाले.

नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 12,917 कोटी रुपये काढले गेले
The highest withdrawal was Rs 12,917 crore in November

आकडेवारीनुसार गेल्या वर्षी जुलैमध्ये 2480 कोटी रुपये काढण्यात आले होते. गेल्या चार वर्षांत इक्विटी योजनांमधून (equity schemes) एवढे पैसे काढण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये 4,000 कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये 734 कोटी रुपये, ऑक्टोबरमध्ये 2,725 कोटी रुपये काढण्यात आले. 2020 मध्ये नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 12,917 कोटी रुपये काढण्यात आले. त्यानंतर डिसेंबरमध्ये 10,147 कोटी रुपये, जानेवारी 2021 मध्ये 9,253 कोटी आणि फेब्रुवारी 2021 मध्ये 4,534 कोटी रुपये काढण्यात आले. यापूर्वी जून 2020 मध्ये या योजनांमध्ये 240.55 कोटींची निव्वळ गुंतवणूक होती.

इक्विटी आणि गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूक वाढली
Investment in equities and gold ETFs also increased

इक्विटी म्युच्युअल फंडांव्यतिरिक्त इक्विटी आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंड्स अर्थात ईटीएफमध्येही गेल्या महिन्यात गुंतवणूक वाढली. आकडेवारीनुसार मार्चमध्ये या योजनांमध्ये 662 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. तर फेब्रुवारीमध्ये 491 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मार्चमध्ये म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण ऍसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 31.43 लाख कोटी रुपये होती. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगाचे एयूएम 31.64 लाख कोटी रुपये होती.
Investors’ confidence in the corona-affected mutual funds has now returned. As a result, equity mutual funds had a net inflow of Rs 9,115 crore in March. This is the first time in the last 9 months that there has been a net inflow in an equity mutual fund.
PL/KA/PL/9 APR 2021
 

mmc

Related post