कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धक्का कमी करता येवू शकतो : फिच रेटिंग्ज

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धक्का कमी करता येवू शकतो : फिच रेटिंग्ज

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (Corona) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे. यामुळे, देशातील बहुतेक भागात टाळेबंदी (Lockdown) आणि निर्बंध (Restrictions) लादण्यात आले आहेत. असे असूनही, जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जचे (Fitch Ratings) मत आहे की 2020 च्या तुलनेत यंदा कोरोना लाटेमुळे आर्थिक घडामोडींना कमी धक्का बसेल. तथापि, फिचच्या मते एप्रिल आणि मेमध्ये आर्थिक घडामोडी कमी झाल्याने पुनर्प्राप्तीस (economis recovery) उशीर होऊ शकेल. दुसरीकडे, फिच रेटिंग्सचे मत आहे की भारतात लसीकरणाची (Vaccination) गती कमी असल्यामुळे कोरोनाची पुढील लाट येण्याची शक्यता कायम आहे. आकडेवारीनुसार, 5 मेपर्यंत केवळ 9.4 टक्के लोकांना लशीचा कमीतकमी एक डोस देण्यात आला आहे.
 

वित्तपुरवठा संस्थांना रिझर्व्ह बँकेचा आधार
Reserve Bank’s support to financial institutions

फिच रेटिंग्सच्या (Fitch Ratings) मते कोरोना (Corona) साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे वित्तीय संस्था (Finance institutions) अडचणित येऊ शकतील, मात्र भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) वित्तीय क्षेत्राला आधार देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करू शकते असा अंदाज आहे. फिच रेटिंग्सनुसार, रिझर्व्ह बँक वित्तीय क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी क्रेडिट गॅरंटी योजना किंवा ब्लँकेट मॉरेटोरियम यासारखे अतिरिक्त निर्णय घेऊ शकते. फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्ष 2022 मध्ये जीडीपीत (GDP) 12.8 टक्के पुनर्प्राप्तीचा अंदाज वर्तवला आहे.

वित्तीय संस्थांना 12 ते 24 महिन्यांसाठी दिलासा
Relief for finance institutions for 12 to 24 months

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नरनी 5 मे रोजी केलेल्या घोषणेमुळे वित्तीय संस्थांना (Finance institutions) 12 ते 24 महिन्यांसाठी दिलासा मिळेल, परंतु मालमत्ता-गुणवत्तेची समस्या ओळखणे आणि त्यावरील उपाय यासंदर्भात चिंता निर्माण होतील. रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक, छोटे व्यावसायिक आणि एमएसएमईंसाठी पुनर्रचना योजना पुन्हा सुरू केली आहे जी वित्तीय संस्थांसाठी महत्त्वपूर्ण असू शकते. मागील वर्ष 2020 मध्ये ज्यांनी पुनर्रचना योजनेचा लाभ घेतला नव्हता ते या वेळी त्याचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त मोरोटोरियम दोन वर्षांपर्यंत वाढवण्याची सुविधा मिळेल. सप्टेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असलेल्या या योजनेंतर्गत कर्जदारांना कर्ज परतफेड करण्यासाठी अधिक वेळ मिळेल आणि वित्तीय संस्थांना जास्त कालावधीसाठी क्रेडीट कॉस्ट स्प्रेड सुविधा मिळेल.
फिच रेटिंग्सच्या (Fitch Ratings) मते देशात अनेक ठिकाणी टाळेबंदी आणि निर्बंध लादण्यात आले आहेत परंतु कंपन्या आणि व्यक्तींनी आपापल्या पद्धतीने त्यात स्वत:ला सामावून घेतले आहे त्यामुळे या वेळी त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. परंतू फिच रेटिंग्सच्या मते टाळेबंदीची व्याप्ती वाढवण्यात आली किंवा देशभरात टाळेबंदी लादण्यात आली तर आर्थिक घडामोडींवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.
 
The second wave of corona is proving more dangerous. As a result, lockdowns and restrictions have been imposed in most parts of the country. Nonetheless, global credit rating agency Fitch Ratings believes the Corona wave will hit economic events less this year than in 2020. However, according to Fitch, the recovery may be delayed due to lower economic activity in April and May.
PL/KA/PL/11 MAY 2021
 

mmc

Related post