कोरोना काळातही सरकारला अप्रत्यक्ष करातून 10.71 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न

 कोरोना काळातही सरकारला अप्रत्यक्ष करातून 10.71 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 कोरोना (Corona) कालावधीतच गेले आहे. परंतु या काळात केंद्र सरकारच्या उत्पन्नात कोणतीही घट झाली नाही. या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराद्वारे (Indirect taxes) 10.71 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या 9.54 लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत हे 12 टक्के जास्त आहे. तर अर्थसंकल्पातील सुधारित अंदाज 9.9 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 8.2 टक्के जास्त आहेत. वित्त मंत्रालयाने (Ministry of Finance) प्राथमिक आकडेवारीमध्ये ही माहिती दिली आहे. यात बदल देखील होऊ शकतात.

जीएसटीची कमाई 8 टक्के घटली
GST revenue fell 8 percent

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वस्तू व सेवा करातून (GST) केंद्राला होणार्‍या उत्पन्नात 8 टक्के घट झाली आहे. केंद्राला जीएसटी, सेट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि भरपाईच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) म्हणण्यानुसार, गेल्या आर्थिक वर्षात केंद्राला जीएसटीमधून 5.48 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तर 2019-20 या आर्थिक वर्षात 5.99 लाख कोटी रुपये मिळाले होते. मात्र सुधारित अंदाजापेक्षा सरकारला 6 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनामुळे कमी झाले जीएसटी व्यवहार
Corona reduced GST transactions

कोव्हिड-19 (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 25 मार्च 2020 ला देशव्यापी टाळेबंदी (Nationwide lockdown) लावली होती. यामुळे देशभरातील व्यावसायिक घडामोडी थांबल्या होत्या. टाळेबंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीएसटी व्यवहारावर (GST transactions) गंभीर परिणाम झाला होता. मात्र, दुसर्‍या तिमाहीत जीएसटी व्यवहारात चांगली वाढ झाली. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी संकलन 1 लाख कोटींच्या पलीकडे होते. मार्च 2021 मध्ये जीएसटी संकलन 1,23,902 कोटी रुपये होते. या एकूण संकलनात केंद्र व राज्य दोघांचाही हिस्सा असतो.

सीमा शुल्कातून 1.31 लाख कोटी मिळाले
1.31 lakh crore from custom duty

वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात सीमा शुल्काद्वारे (custom duty) 1.31 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत त्यात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कराद्वारे (थकबाकी) (Central excise duty and service tax) सरकारला 3.91 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कराच्या रूपाने 2.45 लाख कोटी रुपये मिळाले होते.

प्रत्यक्ष करातही 4.5 टक्क्यांची वाढ
Direct taxes also increased by 4.5 per cent

2020-21 या आर्थिक वर्षात सरकारला प्रत्यक्ष करातून (Direct taxes) 9.45 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. अर्थसंकल्पातील सुधारित अंदाजापेक्षा हे 5श टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी सरकारला प्राप्तीकराद्वारे 4.71 लाख कोटी रुपये मिळाले होते. तर कॉर्पोरेट कराद्वारे 4.57 लाख कोटी रुपये प्राप्त झाले होते. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सद्वारे (एसआयटी) 16,927 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?
What are direct and indirect taxes?

जो कर थेट सर्वसामान्यांकडून वसुल केला जातो त्याला प्रत्यक्ष कर (Direct taxes) म्हणतात. प्राप्तीकर, कॉर्पोरेट कर आणि शेअर्स किंवा इतर मालमत्तावर लावण्यात येणार्‍या कराला प्रत्यक्ष कर म्हणतात. जी कर थेट सर्वसामान्यांकडून घेतला जात नाही परंतु तो सर्वसामान्यांकडूनच वसूल केला जातो त्याला अप्रत्यक्ष कर (Indirect taxes) म्हणतात. यामध्ये उत्पादन शुल्क, सीमा शुल्क किंवा जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. यापूर्वी देशात वेगवेगळ्या प्रकारचे अप्रत्यक्ष कर होते. परंतु 1 जुलै 2017 पासून सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र पेट्रोलियम पदार्थ आणि मद्यावरील कर सध्या जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आला आहे.
The fiscal year 2020-21 has gone by the Corona period. But there has been no decline in central government revenue during this period. The central government has earned Rs 10.71 lakh crore through indirect taxes this fiscal. This is 12 per cent more than the Rs 9.54 lakh crore collection in FY 2019-20.
PL/KA/PL/14 APR 2021
 

mmc

Related post