कोरोना काळात अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची घट

 कोरोना काळात अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची घट

नवी दिल्ली, दि.01 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाच्या जीडीपीत (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीत 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन कोरोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेच्या आधी देशाची अर्थव्यवस्था (economy) सुधारण्याच्या मार्गावर होती असे संकेत मिळतात.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाची अर्थव्यवस्था घसरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. कारण गेल्या वर्षी कोरोना (corona) साथीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. 2019-20 या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत (GDP) 4 टक्क्यांची वाढ होती.

प्रत्यक्ष आकडे अंदाजाच्या तुलनेत चांगले
The actual figures are better than the estimates

गेल्या आर्थिक ग्रॉस व्हॅल्यु ऍडेड मध्ये (GVA) 6.2 टक्क्यांनी घट झाली आहे. जीव्हीए हा अर्थव्यवस्थेच्या (economy) वाढीचा दर जाणून घेण्याचा एक तुलनेने चांगला मार्ग आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या आगाऊ अंदाजात मागील आर्थिक वर्षात आर्थिक विकास दरात 8 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशा प्रकारे प्रत्यक्ष आकडे अंदाजाच्या तुलनेत चांगले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. युटिलिटी क्षेत्रात 9.1 टक्के वाढ झाली आहे. युटीलिटी क्षेत्रात गॅस, वीज, पाणीपुरवठा याचा समावेश होतो. दुसरीकडे सेवांमध्ये 2.3 टक्के घट झाली आहे. सेवांमध्ये हॉटेल, व्यापार आणि वाहतूक यांचा समावेश आहे. तथापि, बांधकाम आणि युटिलिटीज क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे मागील वित्तीय वर्षात जीडीपीत (GDP) अपेक्षेपेक्षा कमी घट झाली.
In the fiscal year 2020-21, the country’s GDP has declined by 7.3 per cent. However, GDP grew by 1.6 per cent in the fourth quarter of last fiscal. This indicates that the country’s economy was on the path to recovery before the second wave of the Corona.
PL/KA/PL/01 JUNE 2021
 

mmc

Related post