खरीपातील चिया पिकाला मिळाला 21 हजार रुपये भाव.
वाशीम दि १ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज खरीप हंगामातील चिया विक्रीचा शुभारंभ करण्यात आला असून चिया पिकाला २१ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळालाय. यावेळी चिया विक्रीसाठी आणलेले शेतकरी रत्नाकर गंगावणे यांचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला.
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीत नवे प्रयोग सुरू केले असून, त्यातूनच रब्बी हंगामात येणाऱ्या चिया पिकाची खरीप हंगामात पेरणी करून राज्यातील पहिलाच प्रयोग रत्नाकर गंगावणे यांनी यशस्वी करून दाखवलाय. त्यांना एकरी 3 क्विंटल उत्पादन मिळालं होतं मात्र अत्यल्प खर्च आणि 21000 रुपये प्रति क्विंटल चे मिळालेले दर यामुळे सोयाबीन सारख्या पारंपारिक पिकापेक्षा याची पीक परवडणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.ML/ML/MS