लाचखोर जीएसटी अधिकारी अटकेत

 लाचखोर जीएसटी अधिकारी अटकेत

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer) लाच घेताना काल अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने (CBI) सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली.

याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला 42.70 लाख रुपयांची रोकड सापडली. अटक करण्यात आलेल्या जीएसटी अधिकाऱ्याचं नाव हेमंत कुमार असून ते CGST च्या भिवंडी आयुक्तालय अधीक्षक पदावर कार्यरत आहे.

फियार्दीने सांगितल्यानुसार, कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरण निपटवण्यासाठी 30 लाख रुपयांचा अवाजवी फायदा मागितल्याच्या आरोपावरून सीजीएसटी अधीक्षक हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींने लाच म्हणून 15 लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेला पहिला हप्ता घेताना या जीएसटी अधिकाऱ्याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.

सुमारे 43 लाखांची रोकडही जप्त

लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने सापळा रचून आरोपी हेमंत कुमारला रंगेहात पकडलं. मुंबई, गाझियाबाद येथील आरोपींच्या कार्यालयात आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये 42.70 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज सीबीआयच्या विशेष न्यायाधीश, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता त्याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. Bribery GST officer arrested

ML/KA/PGB
20 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *