विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटीचे खत जप्त

 विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटीचे खत जप्त

अमरावती, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर येथे गोदामात अनधिकृत आणि विनापरवानगी साठवणूक केलेल्या ११५७९ रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २.३९ कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे,आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी माहुली जहांगीर पोलिस ठाण्यात 5 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती पं.स. चे कृषी अधिकारी उद्धव बाहेकर यांच्या तक्रारीवरून माहुली ठाण्यात भादंवि ४२०,३४, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ याशिवाय रासायनिक खते (नियंत्रण) आदेशाच्या विविध कलमान्वये सुनील कुमार (उत्तर प्रदेश), सांभा अडपाल (क्षेत्रीय व्यवस्थापक, माहुली), अनंत वाडोकर (माहुली), पुरुषोत्तम साबळे (माहुली), महेशकुमार जाठ (भोपाल) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.As much as 2.39 crores worth of manure stored without license seized

ML/KA/PGB
20 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *