अमेरिकन बँका मधील संकटामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड

 अमेरिकन बँका मधील संकटामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड

मुंबई, दि. 18 (जितेश सावंत): गेला संपूर्ण आठवडा भारतीय शेअर बाजारावर अमेरिकेतील बँकामधील दिवाळखोरीच्या संकटांचे पडसादउमटतानादिसले.बाजार आठवडाभरअस्थिरतेच्याछायेखाली वावरताना दिसला.आठवडाभरात अमेरिकेतील तीन बँकांना टाळे लागले. या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजार रक्तबंबाळ झाल्याचे दिसून आले.त्यातच एफआयआयची(FIIs) विक्री देखील सुरुच राहिली.आठवड्यात निफ्टीने 17,000 मनोवैज्ञानिक पातळी तोडली.परंतु कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता, आणि यूएस फेड आगामी धोरणात आक्रमक होणार नाही अशी अपेक्षा असल्याने शेवटचे दोन दिवस बाजाराने बढत घेण्यात यश मिळवले.बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात लाल रंगात बंद झाला.

या सगळ्याचे परिणाम येणाऱ्या काळात जगभरातील बाजारावर उमटताना दिसतील.तसेच उच्च व्याजदर हा बाजारासाठी कळीचा मुद्दा आहे आणि जो जागतिक अर्थव्यवस्थेची सतत नासधूस करत राहील.
अजून एक महत्वाची बातमी म्हणजे अनेक राज्यांमधील H3N2 विषाणूचा वाढता कहर ,महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा , कर्नाटक, तामिळनाडू आणि आसाम यासारख्या काही राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा प्रकरणे वाढत आहेत.या कडेही बाजाराचे लक्ष असेल.
शुक्रवारी DowJones 385 अंक घसरून बंद झाला.युरोपियन बाजारपेठेतही विक्री दिसून आली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले.

Technical view on nifty- मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने 16957 चा स्तर तोडला व 16850 नीचांकी पातळी गाठली. निफ्टीसाठी 16747 हा स्तर अत्यंत महत्वपूर्ण राहील हा स्तर जर तोडला निफ्टीत घसरण वाढू शकेल निफ्टी 16706-16662-16631-16564-16483 पर्यंत पोहोचू शकेल.वर जाण्याकरिता निफ्टीला 17145-17166-17211 हे स्तर पार करावे लागतील त्यानंतर निफ्टी 17353-17405-17446-17517 हे स्तर गाठू शकते. मार्केट ओव्हरसोल्ड आहे.

जागतिक बाजारात कोलाहल
सोमवारी भारतीय बाजाराची सुरुवात सपाट झाली परंतु नंतर झालेल्या तेजीने सेन्सेक्स 200 अंकांनी वर गेला परंतु सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) संकटामुळे शुक्रवारी घसरलेल्या अमेरिकन मार्केटचे पडसाद भारतीय बाजारावर उमटताना दिसले. मोठ्या उलथापालथीनंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला.बाजारात चौफेर घसरणीचे वातावरण होते. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या पतनापाठोपाठ सिग्नेचर बँकेत गोंधळाचे पडसाद उमटल्याने जागतिक बाजारात कोलाहल माजल्याचे दिसून आले. भारतीय बाजारात फेडची भीती, संध्याकाळी जाहीर होणाऱ्या भारताच्या CPI महागाईचे आकडे याचाही दबाव दिसला. दिवसभरात सेन्सेक्स 1000 अंकांपेक्षा जास्त गडगडला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 897.28 अंकांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 258.60 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,154.30 चा बंद दिला. Sensex ends almost 900 points lower.

बाजाराची पडझड सुरूच
सलग चौथ्या दिवशी अत्यंत अस्थिर सत्रात निफ्टीने 17,000 ची पातळी तोडली व घसरणीचा सिलसिला सुरु ठेवला. कमकुवत आशियाई बाजारांच्या संकेतांमुळे बाजाराची सुरुवात नकारात्मकतेने झाली पण बाजार काही वेळातच सपाट झाला. परंतु पुन्हा एकदा बाजाराचा ताबा मंदीवाल्यानी घेतला व बाजार पडला.आयटी, मेटल आणि पीएसयू बँकांच्या शेअर्सची जबरदस्त विक्री झाली.तथापि, 25 महिन्यांच्या कमी WPI महागाईने इंट्राडे तोटा पुसून टाकण्यास मदत केली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 337.66 अंकांनी घसरून 57,900.19 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 111.00 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,043.30 चा बंद दिला. Domestic indices concluded Tuesday’s session broadly in red amid negative global market sentiment

सलग पाचव्या दिवशी बाजार घसरला
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय निर्देशांकांची सुरुवात देखील सकारात्मक झाली. परंतु दुपारनंतर एफएमसीजी आणि आर्थिक क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे सर्व इंट्राडे नफा मिटला आणि निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर संपले.अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे गुंतवणूकदार सतर्क झाले होते. व त्यामुळे भारतीय बाजारात देखील सुरुवातीच्या तेजीनंतर बँक समभागांनी नफा बुकिंगला सुरुवात केली. सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स घसरला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 344.29 अंकांनी घसरून 57,555.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 71.10 अंकांची घट होऊन निफ्टीने 16,972.20 चा बंद दिला. Indices erased early gains and ended Wednesday’s volatile session deeply in red

बाजाराने सलग पाच दिवसांचा घसरणीचा सिलसिला तोडला
सपाट सुरुवातीनंतर, बाजार नफा आणि तोटा यांच्यात झुलत राहिला परंतु पॉवर, तेल आणि वायू, एफएमसीजी, रियल्टी आणि फार्मा समभागातील खरेदीमुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. ईसीबी धोरणाच्या घोषणेपूर्वी, गुंतवणूकदारांचे लक्ष युरोपियन बाजारातील घडामोडींकडे वळले होते बाजारअत्यंतअस्थिर होता परंतु बाजाराने पाच दिवसांचा तोट्याचा सिलसिला तोडला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 78.94 अंकांनी वधारून 57,634.84 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 13.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 16,985.60 चा बंद दिला.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व सलग दुसऱ्या दिवशी बाजाराने बढत घेतली. सकारात्मक जागतिक संकेतांदरम्यान, बाजाराने गॅप-अप सुरूवात केली आणि सकारात्मक राहिले पण काही प्रमाणात नफा बुकिंग देखील दिसून आले. अखेरीस, बाजार सुंदर वाढीसह बंद होण्यास यशस्वी झालानिफ्टीत बँक आणि आयटी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 355.06 अंकांनी वधारून 57,989.90 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 114.40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,100 चा बंद दिला. Indices ended the week broadly in green
(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
18 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *