गुंतवणुकीमुळे आज कृषी क्षेत्रात मोठे बदल : राष्ट्रपती
नवी दिल्ली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी संसदेला संबोधित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात महिला सक्षमीकरण, कोविड लसीकरण, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया आणि शेतकऱ्यांचा उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील शेतकऱ्यांच्या बाबतील महत्त्वाच्या काही गोष्टी संगितल्या आहेत ती माहिती याठिकाणी देत आहोत.
ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशातील शेतकरी सक्षम करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना एक लाख ऐंशी हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. या गुंतवणुकीमुळे आज कृषी क्षेत्रात मोठे बदल दिसून येत आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे देशाच्या कृषी निर्यातीतही विक्रमी वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये कृषी निर्यातीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही निर्यात जवळपास 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
HSR/KA/HSR/31 Jan 2022