बेसन चीला
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
घटक
15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
1 वाटि बेसन पीठ
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
1/2 टीस्पून लालतिखट
1/2 टीस्पून हळद पावडर
मीठ चवीनुसार
तेल
कुकिंग सूचना
प्राथम एका बाउलमध्ये बेसन घ्या आता त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला
आता हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ घालून थोडे-थोडे पाणी घालून बॅटर करून घ्या पण जास्त पातळ किंवा घट्ट करू नये
आता बॅटर मध्ये चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिक्स करून घ्या
आता गॅसवर तवा गरम झाल्यावर त्यात तेल सोडून घ्या तेल गरम झाल्यावर त्यात तयार बॅटर तवावर घाला
आणि बॅटर छान गोल पसरवून घ्या आणि एक बाजू छान खरपूस भाजून झाल्यावर दुसरी बाजू पण छान खरपूस भाजून घ्या
आता तयार गरम गरम बेसन चिल्ला सर्विंग प्लेटमध्ये टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा Besan Chila
ML/ML/PGB
21 Jun 2024