बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी …

 बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा, विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी …

नागपूर, दि. 01 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्यामुळे पुढील आणखी काही दिवस विदर्भात दमदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी येत्या काही दिवसानंतर अनुकूल पाऊस पडण्याची वाट बघावी आणि त्यानंतर शेतीचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.Bay of Bengal low pressure belt, low chance of heavy rains in Vidarbha …

नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम एल शाहू  ML Shahu, Director, Meteorological Department यांनी सांगितले त्यानुसार गेल्या 15 दिवसांमध्ये विदर्भात केवळ 41 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे,त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे .

संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विदर्भाचं पावसाचा खेळ खंडोबा झाला आहे,त्यामुळेचं विदर्भात पावसाचा अनुशेष वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली . मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यास ही तूट भरून निघण्याचा विश्वास देखील शाहू यांनी व्यक्त केला आहे.Bay of Bengal low pressure belt, low chance of heavy rains in Vidarbha …

ML/KA/PGB
1 July 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *