मध्यवर्ती कारागृहात 3000 हजार बंदिवानासाठी तयार झाली खिचडी….
नागपूर दि ३० : समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात यावा, त्यांना नवी आशा व सकारात्मक दृष्टी मिळावी या उद्देशाने नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 3000 बंदिवानांसाठी एकता खिचडी हा विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेला होता. या उपक्रमात नागपूर मध्यवर्ती कारागृहात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 3000 हजार बंदिवान साठी एकता खिचडी तयार केलेली होती. बंदिवाना साठी ठरलेल्या डायट स्केल नुसार ही खिचडी तयार करण्यात आली. तांदूळ, चणाडाळ, तूर डाळ, मूंग डाळ, शेंगदाणे, तेल, तिखट, मीठ, मसाला, धनिया, हळद, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची, फुलगोबी, गाजर, बटाटा, दही इत्यादींचा यात समावेश करण्यात आलेला होता. एकता खिचडी बनविण्यासाठी बंदीवानांनी देखील यात मदत केलेली होती.ML/ML/MS