मोहरी, सोया, हरभरा या सात वस्तूंच्या वायदे व्यवहारावर बंदी
नवी दिल्ली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने सात खाद्यपदार्थांच्या वायदे व्यवहारावर बंदी घातली आहे. यामध्ये गैर-बासमती तांदूळ, गहू, हरभरा, मोहरी, सोयाबीन, कच्चे पाम तेल आणि मूग यांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयाने या सातही वस्तूंच्या वायदे व्यवहारावर सोमवारपासून पुढील एक वर्षासाठी बंदी घातली आहे. दुसरीकडे, सोमवारी लोकसभेत अनुदानाच्या पुरवणी मागणीला मंजुरी देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
नोव्हेंबर महिन्यातील घाऊक महागाईचा दर 14.23 टक्क्यांसह एप्रिल 2005 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. त्याच वेळी, नोव्हेंबरमधील किरकोळ महागाईचा दरही वाढून 4.91 टक्के झाला आहे. या दरम्यान खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेल आणि भाजीपाला यांच्या किरकोळ महागाई दरात २९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत डाळींच्या किरकोळ किमतीत ३.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळेच सरकारने कच्च्या पामतेलासह मोहरी आणि सोया यांच्या वायदे व्यवहारावर बंदी घातली आहे.
पुढील आदेश येईपर्यंत या सात खाद्यपदार्थांचे कोणतेही वायदे व्यवहार होणार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे महागाईला हवा मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये कोणतीही फिजिकल डिलिव्हरी होत नाही आणि ज्या वस्तूंमध्ये तेजी असते, सट्टेबाज त्याला अधिक हवा देतात. घाऊक महागाईत झालेली विक्रमी वाढ पाहता रिझव्र्ह बँकेच्या वतीने बँकांच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Non-basmati rice, wheat, chickpeas, mustard, soyabean, raw palm oil, and moong are included. The finance ministry has banned futures transactions of all these seven items for the next year from Monday. On the other hand, while approving the supplementary demand for subsidy in the Lok Sabha on Monday, Finance Minister Nirmala Sitharaman promised to take necessary steps from the government to check rising prices of edible oil and other essential commodities.
HSR/KA/HSR/21 DEC 2021