वरळी डेअरीच्या जागेवर थीम पार्क नव्हे तर दूध डेअरी !
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वरळी डेअरीच्या जागेवर आता थीम पार्क वगैरे होणार नसून तिथे शासकीय डेअरीच उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . नुकतेच उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात तिथे शासकीय डेअरी कायम राहण्यासाठी दोन्ही पक्षांना सूचना केली असून त्याला यश मिळाले तर तेथे शासकीय डेअरी पुन्हा उभी राहू शकेल असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
वरळी डेअरीची जागा हि ऐन मोक्याच्या ठिकाणी असून मागील आघाडी सरकारच्या काळात तेथे आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन थीम पार्क उभे करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या . त्यासाठी तेथील दूध संकलन पूर्णपणे बंद करण्यात आले . यामुळे मुंबईकरांना सकस दूध मिळणे बंद झाले . व तेथील कर्मचाऱ्यांना इत्तर ठिकाणी पाठवण्यात आले . त्यानांतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने त्या थीम पार्कची संकल्पना बासनात गुंडाळली व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली .त्या समितीने त्या जागेसंबंधी अभ्यास करून निर्णय घ्यायचा होता , या विरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती . उच्च न्यायालयाने नुकताच याबाबत आदेश दिले कि राष्ट्रीय श्रमिक आघडीनें डेअरी सुरु करण्याचा आपला प्रस्ताव देवेंद्र फडणवीस समोर ठेवावा व त्याचा समितीने अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करावी .आम्ही आमचा कालच देवेंद्र फडणवीस यांच्या समितीला केले असून ते याचा सकारात्मक तो निर्णय घेतील , याचा फायदा लाखो मुंबईकरांना होऊन मुंबईकरांना स्वस्त दरातील व पौष्टिक सकस दूध मिळेल . तसेच डेअरी पुन्हा सुरु झाल्याने हजारो लोकांचा रोजगार वाचणार असल्याचे भोसले यांनी सांगितले .
मुंबई महापालिकेच्या के इ एम , नायर , सायन , कूपर , सह सर्वच रुग्णालयात आरेच्या दुधाचे वितरण होते , तसेच शासकीय कार्यालये . मंत्रालय या सर्व ठिकाणी आरेचे दूध दिले जात होते मात्र या सर्वाना आता शासनाचे सकस दूध मिळणार नसून त्यांना बाहेरील खाजगी दूध घेण्याची वेळ आली असल्याचेही भोसले यांनी सांगितले . वरळी डेअरी बंद झाल्याने मुंबईमधील १७०० दूध वितरण केंद्र धारक संकटात आले असून दूध वितरणाचा पारंपरिक व्यवसाय बंद झाल्याने हे परिवार संकटात आले असल्याचेही भोसले यांनी सांगितले .At the place of Worli Dairy, not a theme park, but a milk dairy!
ML/KA/PGB
18 Jan. 2023